Nanded Hospital : नांदेडमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू का झाला? खरंच औषधी नव्हती का?

भागवत हिरेकर

• 09:42 AM • 03 Oct 2023

नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात का झाला २४ रुग्णांचा मृत्यू? रुग्णालय प्रशासनाने औषधी तुटवड्याचा आरोप फेटाळून लावला.

nanded hospital news : 24 patients reasons of the death

nanded hospital news : 24 patients reasons of the death

follow google news

Nanded Hospital Death News Marathi : नांदेडचं डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मृत्यूने थैमान घातलं. 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढील काही तासांत आणखी 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पण, 24 रुग्णांचा मृत्यू कसा झाला आणि औषधीच्या तुटवड्यामुळे हे घडलं का? असे प्रश्न उपस्थित होताहेत. यावर रुग्णालय प्रशासनानेच खुलासा केला आहे. (why 24 patients died in Nanded government hospital)

हे वाचलं का?

रुग्णालय प्रशासनाने या मृत्यूंबद्दल माहिती दिली आहे. वैद्यकीय अधिष्ठाता दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या 24 तासांच्या कालावधीत 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यात 12 रुग्ण प्रौढ (5 पुरुष, 7 महिला) होते. 12 बालक रुग्ण होते.

हेही वाचा >> Relationship: लग्न झालेल्या महिलांकडे पुरुष का होतात सर्वाधिक आकर्षित?, कारण…

प्रौढ रुग्णांनामध्ये 4 जणांना ह्रदयविकाराचा त्रास होता. एकाला विषबाधा झालेली होती. एकाला जठरव्याधी, दोघांना किडनीचा त्रास होता. 1 महिलेच्या प्रसुतीवेळी गुंतागुंत निर्माण झाली. मृत्यू झालेले तीन रुग्ण 3 अपघात जखमी तर इतरांना इतर आजारा होता. मृत्यू झालेल्या बालकांपैकी 4 बालकांना अखेरच्या क्षणी खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते.

औषधी तुटवड्यामुळे मृत्यू झाला का?

मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनाला जबाबदार ठरवण्यात आले. औषधांच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाल्याचाही आरोप झाला. यावर रुग्णालय प्रशासनाने खुलासा केला आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, रुग्णालयात अत्यावश्यक औषधींचा साठा उपलब्ध आहे. जिल्हा नियोजन माध्यमातून या आर्थिक वर्षासाठी 12 कोटींचा निधी देण्यात आला आहे. आणखी 4 कोटी निधी मंजूर झाला आहे.

हेही वाचा >> मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच भाजपने ‘ओबीसी जागर यात्रा’ का काढली?

गेल्या दोन दिवसांत अत्यवस्थ रुग्ण, विशेषतः ज्यांची प्रकृती अंतिम टप्प्यात होती, असे रुग्ण जिल्ह्यातून आणि बाहेरून जास्त प्रमाणात आले. डॉक्टर आणि कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे”, असं प्रशासनाने म्हटलं आहे.

    follow whatsapp