Shravan Month Rules: श्रावण हा पवित्र महिना असल्याचं मानलं जातं. तसेच, शास्त्रात या महिन्यात मद्य आणि मांसाहारी पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या महिन्यात मद्य आणि मांसाहारी पदार्थांचे सेवन करणं टाळलं पाहिजे, असं विज्ञानात देखील सांगितलं गेलं आहे. श्रावणात मांसाहारी पदार्थ आणि मद्य सोडण्यामागे अनेक धार्मिक, वैज्ञानिक और सामाजिक कारणे सांगितली गेली आहेत.
ADVERTISEMENT
पावसाळ्यात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व असतात. या ऋतूमध्ये हवामानातील आर्द्रता वाढते आणि संसर्गाचा धोका खूप जास्त असतो. या काळात मांसामध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू वेगाने वाढतात. ते लवकर कुजते आणि दूषित होण्याचा धोका असतो. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो.
ब्रीडींगचा महिना
पावसाळा हा माशांच्या प्रजनन म्हणजेच ब्रीडींगचा काळ असतो. अनेक राज्यांमध्ये सरकार या काळात मासे न पकडण्याचे निर्देश देतात. आरोग्यतज्ज्ञ देखील या ऋतूमध्ये मासे न खाण्याचा सल्ला देतात. यामागे बरीच कारणे आहेत. पावसाळ्यात पाण्याचे प्रदूषण वाढते. पाण्यात बॅक्टेरियांची संख्या वाढते. परिणामी, माशांच्या माध्यमातून मनुष्यामध्ये संसर्ग पसरून उलट्या आणि जुलाब होण्याचा धोका असतो.
पावसाळ्याचा ऋतू माशांसाठी प्रजनन काळ असतो. या काळात त्यांच्यात अनेक बदल होतात. हे बदल माशांच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. माशांच्या सेवानाने रोगांना बळी पडण्याची शक्यता वाढते.
कमजोर इम्यूनिटीमुळे संक्रमणाचा धोका
पावसाळा रोगांच्या संक्रमणासाठी ओळखला जातो. आयुर्वेद विशेषज्ञ किरण गुप्ता यांच्या मते, पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्यूनिटी कमी होते. संसर्गजन्य आजार केवळ मानवांनाच नाही तर प्राण्यांनाही होतात. म्हणूनच या ऋतूत मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. याच कारणामुळे मांसाहारी पदार्थांचं सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदात पावसाळा हा हलके आणि शाकाहारी पदार्थ खाण्याचा काळ असल्याचं म्हटलं आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकल ट्रेनची गर्दी कमी होणार? रेल्वे विभागाचा मोठा निर्णय...
मांसाहारी पदार्थ पचण्यास अवघड
पावसाळ्याच्या ऋतूत मेटाबॉलिजम आणि पचनाची क्षमता कमी होते. मांसाहारी पदार्थ हे सहजरित्या पचत नाहीत. असे पदार्थ पचवण्यासाठी शरीराला अधिक मेहनत घ्यावी लागते. अशा परिस्थितीत पचनासाठी शरीरावर अधिक दबाव पडल्याकारणाने गॅस, अपचन, अॅसिडिटी आणि जडपणाची समस्या उद्भवू शकते.
अल्कोहोलमुळे शरीरात पाण्याची कमतरता
उन्हाळ्यात सतत घाम येत असल्याकारणाने जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर सुरू होणाऱ्या पावसाळ्यात शरीरातील अधिक पाणी बाहेर पडते. आर्द्रतेमुळे जास्त घाम येतो. शरीरात पूर्वीपेक्षा जास्त पाण्याची कमतरता निर्माण होते. अशा परिस्थितीत अल्कोहोल शरीरात उष्णता निर्माण करते आणि डिहाइड्रेशनचे कारण बनते. त्यामुळे रक्तदाबातही चढ-उतार होतात.
हे ही वाचा: पुणे कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट, तरुणीला शिक्षिकेनंच केलं होतं मार्गदर्शन, खोट्या तक्रारीसाठी...
मद्यापासून दूर राहिल्याने आजारांचा कमी धोका..
पावसाळ्यात रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचं सर्वांनाच माहित आहे. तसेच, राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या (NIH) अहवालानुसार, दारूमुळे रस्ते अपघातांचा धोका वाढतो. ब्राझीलमधील रिओ दि जेनेरिया येथे केलेल्या संशोधनातून 42.5 टक्के प्राणघातक रस्त्यांवरील अपघात दारू पिणाऱ्या लोकांमुळे झाले असल्याचं दिसून आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, दारू प्यायल्याने रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढते. मद्यधुंद अवस्थेत नसलेल्या व्यक्तींवरही याचा घातक परिणाम होतो.
ADVERTISEMENT
