Jyoti Malhotra Latest Video Viral : हरियाणा येथील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्योतीला अटक केल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आली. तपास यंत्रणांकडून ज्योतीची कसून चौकशी केली जात आहे. ज्योती पाकिस्तानच्या हाय कमिशनच्या एका अधिकाऱ्याच्या सतत संपर्कात होती, अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. या अधिकाऱ्यावर याआधीच भारत सरकारकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता.
ADVERTISEMENT
यूट्यूबर ज्योती मल्होत्रा तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे अडचणीत सापडली आहे. या व्हिडीओत ती पाकिस्तानच्या हाय कमिशनने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत एका अधिकाऱ्याशी चर्चा करताना दिसते. या अधिकाऱ्याला भारत सरकारने हेरगिरीच्या आरोपाखाली 'पर्सोना नॉन ग्राटा' घोषित करून देशातून बाहेर काढलं होतं.
हे ही वाचा >> शिवराजला मारणाऱ्या समाधान मुंडेला बेदम मारहाण? नव्या व्हिडीओमध्ये नेमकं काय?
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या पाकिस्तानी अधिकाऱ्याचं नाव एहसान-उर-रहीम उर्फ दानिश आहे. एका व्हिजा एजंटने वर्ष 2023 मध्ये पाकिस्तानच्या प्रवासादरम्यान ज्योतीला या अधिकाऱ्याचा कॉन्टॅक्ट दिला होता. त्याचदरम्यान ज्योतीची दानिशसोबत ओळख झाली. तेव्हापासूनच पाकिस्तानी एजन्सीसोबत तिचा संपर्क वाढला, असा आरोप आहे.
ज्योतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ती पाकिस्तानी हाय कमिशन दानिशसोबत पार्टीत सामील झाल्याचं समोर आलंय. ती कॅमेरासमोर म्हणते, त्यांना आणि या अरेंजमेंट्सला पाहून मला खूप आनंद झाला. दानिश ज्योतीला अन्य पाहूण्यांची भेट करून देत म्हणतो, यांचं नाव ज्योती आहे. ही एक यूट्यूब आणि व्लॉगर आहे. तिचं 'ट्रॅव्हल विथ जो' या नावाने चॅनल आहे आणि 100 K हून अधिक तिचे सब्सस्क्रायबर आहेत.
हे ही वाचा >> ग्राहकांसाठी दिवाळीच! आज सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण, किंमत वाचून खुश व्हाल
तपासात समोर आलं आहे की, ज्योती आणि दानिश यांच्यात दिल्ली स्थित पाकिस्तानी हाय कमिशनमध्ये अनेकदा चर्चा झाली. तसच त्यांनी व्हाट्सअॅप, टेलीग्रॅम, स्नॅपचॅटसारख्या प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानच्या इंटेलिजेंस ऑपरेटिव्हसोबत संपर्क ठेवला आणि त्यांच्यापर्यंत संवेदनशील माहिती पोहोचवली.
ADVERTISEMENT
