एक दोन नाही, 16 जिवंत साप प्रवाशाचे बॅगेत सापडले आणि मुंबई विमानतळावरच्या आख्ख्या यंत्रणा हादरल्या

मुंबई तक

29 Jun 2025 (अपडेटेड: 29 Jun 2025, 10:11 AM)

सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री या प्रवाशाला ताब्यात घेतलं. त्याच्या सामानाची तपासणी केली असताना, कॉटनने भरलेल्या पिशवीत 16 जिवंत साप आढळले.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सीमा शुल्क विभागाच्या कारवाईत सापडले साप

point

सामान तपासत असताना एका बॅगेत साप

point

मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

मुंबई : मुंबईतील छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रात्री एकच खळबळ उडाली. एका प्रवाशाच्या सामानात 16 जिवंत साप आढळले तेव्हा ही घटना घडली. शुक्रवारी रात्री थायलंडची राजधानी बैंकॉकहून आलेल्या या प्रवाशाच्या सामानात कॉटनच्या पिशवीत लपवलेले साप आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे. ही माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं शनिवारी एका वृत्तसंस्थेला दिली.

हे वाचलं का?

सामान तपासणीत सापांचा सुळसुळाट

हे ही वाचा >> झाडाला लटकलेला, सडलेल्या अवस्थेत सापडला नेपाळी युवकाचा मृतदेह, सिंधुदुर्ग हादलं, घटना काय?

सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री या प्रवाशाला ताब्यात घेतलं. त्याच्या सामानाची तपासणी केली असताना, कॉटनने भरलेल्या पिशवीत 16 जिवंत साप आढळले. यामध्ये दोन केन्याई सँड बोआ,  तीन अ‍ॅल्बिनो साप, दोन होंडुरन मिल्क स्नेक, एक कॅलिफोर्निया किंगस्नेक, दोन गार्टर स्नेक आणि एक अ‍ॅल्बिनो रॅट स्नेक यांचा आणि इतर पाच सापांचा समावेश आहे. या सापांच्या प्रजाती परदेशी असून, त्यांची तस्करी हा गंभीर गुन्हा मानला जातो.

वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई

पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्यूरो आणि सीमा शुल्क विभाग यांच्यासह वन्यजीव संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार या सापांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात रॉ (रेस्क्विंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर) या संस्थेच्या तज्ज्ञांनी सापांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितपणे हाताळण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत घेण्यात आली आहे.

हे ही वाचा >> एकाच वेळी दोन मुलींकडून ऑफर, तरूण हॉटेलमध्ये पोहचला अन् सुरू झाला घाणेरडा खेळ!
 

तपासाला गती, कायदेशीर कारवाई सुरू

सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, प्रवाशाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रवाशाने सापांची तस्करी का आणि कशासाठी केली, याचा तपास पोलिस आणि सीमा शुल्क विभाग करत आहे.