वसईः वसई येथून एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या स्वतःच्या 16 वर्षीय भाचीला चालत्या लोकलमधून ढकलून तिची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे. मृत भाचीचे नाव कोमल सोनार हत्या करणाऱ्या नराधम मामाला पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
कोमल ही तिच्या आईसोबत मानखुर्द येथे राहत होती. 15 नोव्हेंबर 2025 रोजी कोमल अचानक घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे शोधाशोध केली, मात्र ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी 16 नोव्हेंबर रोजी सकाळी कोमल नालासोपारा येथे तिचा छोटा मामा अर्जून सोनीच्या घरात असल्याची माहिती मिळाली. मात्र तिची मोठी मामी अंजलीला आणण्यासाठी पोहोचल्यावर कोमल पुन्हा गायब झाली असल्याचं तिला सांगण्यात आलं.
हे ही वाचा>> मामाच्या मुलाने 8 वर्षे ठेवले शारीरिक संबंध... नंतर, दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं!
पण हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याचं कोमलच्या मोठ्या मामीला वाटलं. त्यामुळे तिने तात्काळ वाळीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मोठी मामी अंजली सोनी हिने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी सुरुवातीला कोमलच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, काही वेळाने कोमलच्या मोबाइलवरून आरोपी मामा अर्जुन सोनी याने फोन करून कोमल आपल्या सोबत असल्याचे घरी सांगितले. ज्यानंतर कोमलच्या आईने अर्जुनला तिला त्वरित घरी आणण्यास सांगितले. परंतु अर्जुनने तसे केले नाही.
दरम्यान, 17 नोव्हेंबर 2025 रोजी कोमलचा भाईंदर परिसरात रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती कोमलच्या आईला मिळाली. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर आरोपी मामा अर्जुन पोलिसांच्या ताब्यात असल्याचे दिसून आले.
हे ही वाचा>> पती भाजी विकून आला घरी, पत्नी प्रियकरासोबत अंथरुणात आक्षेपार्ह स्थितीत नको तेच.. नंतर लॉयल पतीलाही... भयंकर कांड
रेल्वे पोलीस तपासानुसार भाईंदर स्टेशनवरून दोघेही चर्चगेट–विरार लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात चढले होते. दरवाज्यावर उभे असताना आरोपी अर्जुनने कोमलला मागून ढकलले, त्यामुळे ती नायगावजवळ ट्रॅकवर पडून तिचा जागीच मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शी विरार येथील प्रवासी विक्रम नंदू झा यांनी ही संपूर्ण घटना डोळ्यांनी पाहिली असून, इतर प्रवाशांच्या मदतीने आरोपीला पकडून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांचा जबाब वसई रोड रेल्वे पोलिसांनी नोंदवला आहे. आणि आरोपीला सध्या पोलिसांनी अटक केली आहे.
कोमलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी टेंभा हॉस्पिटल, भाईंदर येथे पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, कोमलच्या मामाने हे विचित्र कृत्य का केलं? याबाबत मात्र अद्याप नेमकी कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या पोलीस आरोपी मामाची कसून चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT










