दिल्ली: दिल्लीच्या मंगोलपुरीमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचे हातपाय बांधले आणि ब्लँकेटने तोंड बांधून नंतर तिचा गळा दाबून खून केला. ज्यानंतर आरोपी तरुणाने महिलेचा मृतदेह एका बेड बॉक्समध्ये कोंबला. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात 22 वर्षीय प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
7 एप्रिल रोजी मंगोलपुरी पोलीस ठाण्यात एक पीसीआर कॉल आला. माहिती मिळताच, पोलिसांचं एक पथक तात्काळ पत्थर मार्केटमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले, जिथे अमरजीत नावाचा एक व्यक्ती पीजी चालवत होता.
जेव्हा एका खोलीतील डबल बेड बॉक्स उघडण्यात आला, तेव्हा पोलीस थक्क झाले. कारण आतमध्ये एका महिलेचा मृतदेह कोंबलेला होता. महिलेच्या कपाळावर जखमा आढळल्या, तिचे हात आणि पाय बांधलेले होते आणि तिच्या मानेवरही व्रण आढळले.
तपासात मृत महिलेच्या कपाळावर गळा आवळल्याच्या खुणा आणि एक खोल जखम असल्याचे उघड झाले. तिचे हात आणि पायही बांधलेले आढळले.
फॉरेन्सिक तपास
या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हेगारी पथक आणि एफएसएल (FSL) पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले.
हे ही वाचा >> निष्पाप वाटणाऱ्या चेहऱ्याने दगा दिला, दरोड्याचा बनाव अन् थंड डोक्याने नवऱ्याची हत्या, प्रियंका खुनी का बनली?
पीडितेची ओळख
मृत महिलेची ओळख मंगोलपुरी येथील 35 वर्षीय महिला म्हणून पटली आहे.
कसे उघडकीस आले प्रकरण?
पोलिसांच्या चौकशीतून आणि प्राथमिक तपासात असे उघड झाले की, मृत महिलेचे एका पुरुषासोबत संबंध होते. तो पुरुष आणि ती महिला 7 एप्रिल रोजी दुपारी 4.30 च्या सुमारास पीजीमध्ये दाखल झाले होते. सुमारे एका तासानंतर जेव्हा आरोपी खोलीतून एकटाच बाहेर पडला, तेव्हा पीजी मालकाला संशय आला. त्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. जेव्हा पोलिसांनी खोलीची तपासणी केली आणि पलंग उघडला, तेव्हा त्यांना आत महिलेचा मृतदेह पाहून धक्का बसला.
हे ही वाचा >> रिक्षा चालकावर जीव जडला, पत्नीने भयंकर कट रचला, बँक अधिकारी असलेल्या पतीला संपवलं
आरोपीला तात्काळ अटक
मंगोलपुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत सुरेंद्र बॉबी, जोगिंदर आणि दीपक या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सध्या पोलीस आरोपींची चौकशी करत असून हत्येमागील हेतूचा तपास करत आहेत. महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचाही संशय आहे. पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.
ADVERTISEMENT











