महाराष्ट्र: 38 वर्षीय विवाहित पुरुषाचं शेजारच्या 23 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम, नकार सहन न झाल्याने केला खून

नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोधणी येथे प्रेमसंबंधातून एक भयानक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय तरुणीचा निर्घृण खून करण्यात आल्याचं वृत्त आहे. घटनेतील आरोपी तरुण विवाहित असून तो पीडितेच्या घराच्या शेजारी राहत असल्याचं सांगितलं जात आहे.

नकार सहन न झाल्याने तरुणीचा केला खून

नकार सहन न झाल्याने तरुणीचा केला खून

योगेश पांडे

22 Jan 2026 (अपडेटेड: 22 Jan 2026, 11:27 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

38 वर्षीय विवाहित पुरुषाचं शेजारच्या 23 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम

point

नकार सहन न झाल्याने तरुणीचा केला खून

point

नागपूरमधील धक्कादायक घटना

Nagpur Crime: नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोधणी येथे प्रेमसंबंधातून एक भयानक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय तरुणीचा निर्घृण खून करण्यात आल्याचं वृत्त आहे. घटनेतील आरोपी तरुण विवाहित असून तो पीडितेच्या घराच्या शेजारी राहत असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पीडितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याचं हे वागणं लक्षात येताच तरुणीने त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरूवात केली. याच रागातून आरोपी तरुणाने पीडितेची हत्या केली. 

हे वाचलं का?

शेजारच्या विवाहित तरुणाचं एकतर्फी प्रेम... 

वृत्तानुसार, घटनेतील 23 वर्षीय मृत तरुणीचं नाव प्राची खापेकर असून ती नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोधणी येथील रहिवासी होती. तसेच, ती B.A (बी.ए) चं शिक्षण घेत होती आणि तिच्या शेजारी राहणाऱ्या शेखर ढोरे या तरुणाच्या पत्नीसोबत ती शिवणकाम देखील करत होती. प्राची आपल्या पत्नीसोबत काम करत असल्याच्याच फायदा घेत शेखरने तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला आणि ही बाब प्राचीच्या लक्षात आली. त्यानंतर, तिने शेखरपासून दूर राहण्यास सुरूवात केली. 

हे ही वाचा: शेतात निघालेल्या विवाहितेला दिवसाढवळ्या उचललं, बळजबरीने थारमध्ये बसवून... नेमकं प्रकरण काय?

रागाच्या भरात तरुणीचा गळा दाबला अन्... 

मात्र, प्राची आपल्यापासून दूर राहत असल्याचा राग आरोपी शेखरच्या मनात होता. याच रागाच्या भरात तो मंगळवारी (20 जानेवारी) प्राचीच्या घरात गेला. त्यावेळी, तिच्या घरी कुटुंबातील दुसरं कोणीच नव्हतं. तेव्हा आरोपी शेखर आणि पीडितेमध्ये मोठा वाद झाला. या वादातून आरोपीने प्राचीचा गळा दाबला आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तरुणीचा मृत्यू झाल्याचं लक्षात येताच शेखर घाबरला आणि त्याने स्वत:ला वाचवण्यासाठी प्राचीचा मृतदेह ओढणीला फास बनवून सिलिंग फॅनला लटकवला. या घटनेला आत्महत्या दाखवण्याचा त्याचा उद्देश होता. त्यानंतर, तो घटनास्थळावरून फरार झाला. 

हे ही वाचा: ठाकरे गटाच्या नॉट रिचेबल नगरसेविका 24 तासांनंतर समोर, पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाल्या...

पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह 

पीडितेचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर, प्राचीचा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर, तातडीने मानकापूर पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट्समध्ये, ही आत्महत्या नसून प्राचीच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. त्या दृष्टीने पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आणि संशयित म्हणून आरोपी शेखरला ताब्यात घेतलं. शेवटी, कठोर चौकशीदरम्यान शेखरने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली आणि त्यानंतर पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली. 

    follow whatsapp