शेतात निघालेल्या विवाहितेला दिवसाढवळ्या उचललं, बळजबरीने थारमध्ये बसवून... नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

शेतात कामासाठी निघालेल्या महिलेचं दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारमधून आलेल्या आरोपींनी अचानक महिलेला बळजबरीने गाडीत बसवलं. तिच्यासोबत नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.

ADVERTISEMENT

महिलेला बळजबरीने थारमध्ये बसवलं अन्...
महिलेला बळजबरीने थारमध्ये बसवलं अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शेतात निघालेल्या विवाहितेला दिवसाढवळ्या उचललं

point

बळजबरीने थारमध्ये बसवून... नेमकं प्रकरण काय?

Crime News: शेतात कामासाठी निघालेल्या महिलेचं दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही राजस्थानच्या अलवर येथे घडली. दरम्यान, थार कारमधून आलेल्या आरोपींनी अचानक महिलेला बळजबरीने गाडीत बसवलं आणि तिचं अपहरण केलं. पीडितेचं सहा महिन्यांपूर्वीच लव्ह मॅरेज झालं असून ती तिच्या पतीसोबत राहत होती. सध्या, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे. 

हे प्रकरण अलवर जिल्ह्याच्या गोविंदगड पोलीस स्टेशन हद्दीतील चिमरवाडा गावातील असल्याचं वृत्त आहे. संबंधित महिला शेतात कामासाठी जात असताना वाटेत एक कार वेगाने येताना दिली. ती गाडी दिसताच महिला रस्त्याच्या कडेला झाली. त्यावेळी अचानक शेतात लपून बसलेला तरुण अचानक मागून आला आणि त्याने पीडितेला पकडून बळजबरीने गाडीत बसवलं. त्यानंतर, आरोपी गाडीतून फरार झाले. 

हे ही वाचा: पलाश मुच्छलने स्मृती मानधनाच्या बालमित्राला 40 लाखांचा गंडा घातला, सांगलीच्या पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल

गावकरी घटनास्थळी धावले अन्...  

दरम्यान, आरोपींच्या तावडीतून सुटण्यासाठी महिलेने खूप प्रयत्न केले. त्यावेळी, पीडितेचा आरडाओरडा ऐकून आसपासच्या शेतात काम करणारे गावकरी घटनास्थळी धावले, मात्र तोपर्यंत आरोपी महिलेला घेऊन गाडीतून फरार झाले. महिलेचं अपहरण झाल्याचं समजताच गावातील लोक मोठ्या संख्येत घटनास्थळी दाखल झाले आणि पीडितेच्या कुटुंबियांना सुद्धा याची माहिती देण्यात आली. 

हे ही वाचा: 'मनसे वारंवार भूमिका बदलतं..', पाहा निवडणुकीआधी 'या' प्रश्नावर काय म्हणालेले राज ठाकरे

घटनेनंतर, महिलेच्या पतीने गोविंदगड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तसेच पोलीस कंट्रोल रूमला या प्रकरणाची माहिती देण्यात आली. संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलीस कारवाई सुरू केला आणि संभाव्य मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली. यासोबतच, आसपासच्या परिसरात पीडितेचा शोध घेण्यास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेत वापरण्यात आलेल्या थार कारची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी, आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. सध्या, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp