पलाश मुच्छलने स्मृती मानधनाच्या बालमित्राला 40 लाखांचा गंडा घातला, सांगलीच्या पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल

मुंबई तक

Palash Muchhal cheated smriti mandhana childhood friend vigyan mane : पलाश मुच्छल सांगलीत आल्यानंतर स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांनी विज्ञान माने आणि पलाश मुच्छल यांची ओळख करून दिली होती.

ADVERTISEMENT

Palash Muchhal cheated smriti mandhana childhood friend vigyan mane
Palash Muchhal cheated smriti mandhana childhood friend vigyan mane
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पलाश मुच्छलने स्मृती मानधनाच्या बालमित्राला 40 लाखांचा गंडा घातला

point

सांगलीच्या पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल

Palash Muchhal cheated smriti mandhana childhood friend vigyan mane : गायक पलाश मुच्छल (Palash Muchhal) याने सांगलीतील युवकाची 40 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी सांगली येथील विज्ञान माने या युवकाने बुधवारी (दि.21) सायंकाळी सांगलीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली असून, या तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे. तक्रारदार विज्ञान माने हा पलाश मुच्छलची एक्स गर्लफ्रेंड आणि भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना (smriti mandhana) हिचा बालमित्र आहे. विज्ञान माने लहानपणापासून स्मृतीसोबत क्रिकेट खेळत होता. सध्या विज्ञान माने हा चित्रपट फायनान्सर म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह मोडल्यानंतर काही आठवड्यांनी हा फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. 

 ‘नजरिया’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल गुंतवले 40 लाख 

पलाश मुच्छल सांगलीत आल्यानंतर स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांनी विज्ञान माने आणि पलाश मुच्छल यांची ओळख करून दिली होती.
त्यानंतर पलाश मुच्छल याने ‘नजरिया’ या नवीन चित्रपटाची निर्मिती करत असल्याचे सांगत, या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल आणि गुंतवलेली रक्कम परत मिळेल, असे आश्वासन दिले. या विश्वासावर विज्ञान माने याने ‘नजरिया’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल 40 लाख रुपये गुंतवले.

हेही वाचा >: राज ठाकरेंनी मुभा दिली म्हणूनच KDMC मध्ये महायुतीला पाठिंबा, मनसेच्या माजी आमदाराने सगळं सांगितलं

तक्रारीनुसार, विज्ञान माने याने ही रक्कम वेळोवेळी रोख स्वरूपात तसेच गुगल पेच्या माध्यमातून पलाश मुच्छल याला दिली आहे. या व्यवहारांचे पुरावेही तक्रारीसोबत जोडण्यात आले आहेत. मात्र, संबंधित चित्रपटाचे काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर विज्ञान माने यांनी आपली गुंतवणूक परत मागितली असता पलाश मुच्छल याने वेळकाढूपणा करत सतत नवे वायदे दिले. पुढे पलाश मुच्छल याने विज्ञान माने यांचे फोन उचलणे टाळण्यास सुरुवात केली आणि अखेरीस त्यांचा मोबाईल नंबरही ब्लॉक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp