'मनसे वारंवार भूमिका बदलतं..', पाहा निवडणुकीआधी 'या' प्रश्नावर काय म्हणालेले राज ठाकरे
KDMC MNS: मनसे वारंवार भूमिका का बदलतं? पाहा या प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी नेमकं काय उत्तर दिलं होतं.
ADVERTISEMENT

मुंबई: कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) निवडणूक निकालानंतर अवघ्या पाचच दिवसात मनसेने ज्या शिवसेनेविरुद्ध (शिंदे गट) प्रचार करत कल्याण-डोंबिवलीकरांकडे मतं मागितली होती त्यांनाच आता पाठिंबा दिला आहे. मनसेने अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका होत आहे.
दरम्यान, मनसे वारंवार भूमिका का बदलतं? हाच सवाल मुंबई Tak च्या महाचावडीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. पाहा तेव्हा राज ठाकरेंनी नेमकं काय उत्तर दिलं होतं.
पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणालेले
मनसे वारंवार भूमिका बदलतं.. याचबाबतचा प्रश्न मुंबई Tak च्या महाचावडीवर राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. पाहा तेव्हा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते.
प्रश्न: तुमच्याबाबत असा प्रचार होतो की, मनसे कायम राजकीय भूमिका बदलत जातं, प्रत्येक निवडणुकांमध्ये.. याचा तुम्हाला सर्वाधिक फटका बसतो का मतदानाच्या राजकारणात?










