ठाकरे गटाच्या नॉट रिचेबल नगरसेविका 24 तासांनंतर समोर, पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाल्या...

मुंबई तक

Shivsena Thackeray group corporator Sarita Mhaske : डॉ. सरिता म्हस्के या अवघ्या पाच दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक 157 मधून शिवसेना (ठाकरे गट)च्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. निवडणुकीनंतर काही दिवसांतच त्या संपर्कात येत नसल्याने आणि गट नोंदणीसाठी नवी मुंबई येथे झालेल्या बैठकीस त्या गैरहजर राहिल्याने पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलं होतं. सरिता म्हस्के या शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळालं.

ADVERTISEMENT

Shivsena Thackeray group corporator Sarita Mhaske
Shivsena Thackeray group corporator Sarita Mhaske
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरे गटाच्या नॉट रिचेबल नगरसेविका 24 तासांनंतर समोर,

point

पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाल्या...

Shivsena Thackeray group corporator Sarita Mhaske : मुंबई महापालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ‘नॉट रिचेबल’ असलेल्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के तब्बल 24 तासांच्या राजकीय नाट्यानंतर अखेर समोर आल्या आहेत. सरिता म्हस्के दिवसभर नॉट रिचेबल असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, आता सरिता म्हस्के यांनी स्वतः समोर येत या सर्व चर्चांवर पडदा टाकलाय. 

डॉ. सरिता म्हस्के या अवघ्या पाच दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक 157 मधून शिवसेना (ठाकरे गट)च्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. निवडणुकीनंतर काही दिवसांतच त्या संपर्कात येत नसल्याने आणि गट नोंदणीसाठी नवी मुंबई येथे झालेल्या बैठकीस त्या गैरहजर राहिल्याने पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलं होतं. सरिता म्हस्के या शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळालं.

हेही वाचा : उज्ज्वल निकमांचा गेम चेंजिंग युक्तीवाद, किसनराव हुंडीवाले प्रकरणात 10 जणांना जन्मठेप, भाजप नेत्याचं कुटुंब होतं सामील

मिलिंद नार्वेकरांच्या प्रयत्नांना यश 

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विश्वासू नेते आणि विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मध्यरात्री विशेष प्रयत्न करत सरिता म्हस्के आणि त्यांच्या पतीशी संपर्क साधला. अखेर 24 तासांनंतर त्या सरिता म्हस्के समोर आल्या असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना रात्री मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp