Crime News: महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घडल्याचं समोर आलं आहे. या जिल्ह्यातील एका शहरात 7 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या 14 वर्षीय सख्ख्या चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याचं संतापजनक वृत्त समोर आलं आहे. ही घटना 13 ऑगस्ट रोजी रात्री उशीरा घडल्याची माहिती आहे. नातेसंबंधाला लाज आणणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
पोलिसांच्या माहितीनुसार, नवीन जालना परिसरात राहणारी 7 वर्षीय पीडिता तिच्या 14 वर्षीय सख्ख्या चुलत भावासोबत होती. यादरम्यान ते दोघे एकटेच असल्याचा फायदा घेऊन आरोपी तरुणाने तिच्या बहिणीसोबतच बळजबरीने घृणास्पद कृत्य केलं. पीडितेने तिच्या आईला घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल सांगितलं. त्यानंतर, मुलीची आई तातडीने तिला घेऊन जवळच्या रुग्णालयात गेली.
उपचारादरम्यान थेट पोलिसांना माहिती...
पीडितेची गंभीर अवस्था असल्याकारणाने रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला जिल्हा रुग्णालयात रेफर केलं. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी लगेच पोलिसांना याबाबतीत सूचना दिली. त्यानंतर पीडितेवर उपचार सुरू करण्यात आले.
हे ही वाचा: अर्जुन तेंडुलकरने बालपणीच्या मैत्रिणीसोबतच उरकला साखरपुडा... सानिया चंडोक नेमकी आहे तरी कोण?
पोलिसांनी केली कारवाई
संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच कदीम जालना पोलिस ठाण्याचे निरीक्षक जनार्दन शेवाळे, सदर बाजार पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप भारती आणि पिंक मोबाईल स्क्वॉडचे उपनिरीक्षक किशोर वनवे जिल्हा रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी त्या ठिकाणी पोहचल्यानंतर पीडित मुलगी आणि तिच्या आईने जबाब नोंदवले आणि अल्पवयीन आरोपीविरोधात POCSO अॅक्ट आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला. सध्या, अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच, प्रकरणातील तपासाची जबाबदारी पिंक मोबाइल पथकाकडे सोपवण्यात आली आहे.
हे ही वाचा: Govt Job: इंडियन नेव्हीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी... 'या' पदांसाठी निघाली बंपर भरती
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला कायद्याच्या विरोधात असलेल्या मुलाच्या श्रेणीत ठेवून त्याची चौकशी केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. परिसरात घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संताप आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक लोक या घटनांसाठी कठोर शिक्षा करण्याची मागणी करत आहेत.
ADVERTISEMENT
