crime news : चोरी करणारा व्यक्ती जर हा कुटुंबातील निघाला तर कुटुंबातील सदस्यांचा विश्वासघात तुटतो. एका तरुणीने आपल्याच घरात चोरी केली आहे. एका तरुणीने आपल्या मैत्रिणींना सोबत घेतलं आणि दागिन्यांची चोरी केली. या घटनेनं कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनं कुटुंबात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील आहे. तरुणीने आपल्या मैत्रिणींना हाताशी धरत आपल्याच घरात चोरी केल्याचं नेमकं प्रकरण समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लेकीच्या संसारात सासू करायची लुडबुड, अखेर जावयाची सटकली, मटण तोडल्यासारखे केले 19 तुकडे, पोलिसांचीही टरकली
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी संबंधित आरोपी तरुणीला अटक केली आहे. दरम्यान, त्या चोरी करणाऱ्या मुलीसह इतर मैत्रिणींचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. ही घटना रायबरेली जिल्ह्यातील गुरबख्शगंज ठाणे क्षेत्रातील आहे. त्याच ठिकाणी रहिवासी असलेल्या काही मुलींना हाताशी धरून तरुणीने चोरी केली. या चोरीमध्ये काही महत्त्वपूर्ण दागिने लंपास केले. विश्वासघात करणारे दुसरे तिसरे कोणीही नसून कुटुंबातील मुलगीच होती. यामुळे कुटुंबाचा तिच्यावरून विश्वास उडून गेला.
पीडित गुड्डू आपल्या पत्नी आणि लेक अन् जावयाला घेऊन हरियाणाला मजूरी करण्यासाठी गेला होता. घर सोडण्यापूर्वी त्याने आपल्या घरी काही मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवल्या होत्या. त्यानंतर दोन महिन्यानंतर गुड्डू घरी परतला असता, सुरक्षित ठिकाणी ठेवलेले दागिने त्या ठिकाणी नव्हतेच. संबंधित प्रकरणाची गुड्डूची पत्नी आशा अवस्थीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस तपासाच्यादरम्यान सोनालीचं नाव समोर आलं. तेव्हा सोनालीने आपल्या आईसमोर चोरी केल्याचं मान्य केले. त्यानंतर खरी परिस्थिती समोर आली आहे.
हे ही वाचा : दोघींना स्विमिंग पूलजवळ नेलं अन् सामूहिक अत्याचार... निष्पाप मुलींसोबत घडलं भयानक...
घरात चोरी अन् जामीन मंजूर
पोलिसांनी सोनाली आणि तिच्या इतर मैत्रिणी सुमन, मुस्कान आणि हिमांशीला अटक केली. तपासातून त्यांनी दागिन्यांची चोरी केली आणि त्याची सोनाराला विक्री केली. पोलिसांनी दुकानातून विक्री करण्यात आलेले दागिने जप्त केले. चौघांनाही न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना आता जामीन मंजूर करण्यात आला.
ADVERTISEMENT
