Crime News: कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यातील कोरटगेरे येथून एक भयानक हत्याकांड उघडकीस आलं आहे. पेशाने डेन्टिस्ट असलेल्या एका तरुणाने त्याच्या दोन साथीदारांसह मिळून त्याच्या सासूची निर्घृणपणे हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. या प्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT
असा झाला घटनेचा खुलासा
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परिसरात मानवी मृतदेहांचे तुकडे विखुरलेले आढळले, ज्यामध्ये दोन हात, स्नायूंचे काही भाग आणि आतड्यांचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकलेले आढळले. हे दृश्य अत्यंत भयानक होतं. पोलिसांनी त्वरीत हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. यासाठी पोलिसांनी सध्याच्या बेपत्ता व्यक्तींच्या नोंदणीची तपासणी केली आणि त्यावेळी मृताच्या वयाशी जुळणारी एक महिला 3 ऑगस्ट रोजी बेल्लवी येथून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली.
हे ही वाचा: दोन मुलांच्या विधवा आईचा बॉयफ्रेंडसोबत रोमान्स! अचानक मुलाने सगळंच पाहिलं अन् नंतर घडलं...
पांढऱ्या कारमधून बळजबरीने नेलं...
पोलिसांनी लक्ष्मी देवीबद्दल चौकशी केली असता ती शेवटची पांढऱ्या कारमध्ये दिसली असल्याचं कळालं. या सुगावामुळे हत्येमागचं सत्य समोर आलं. चौकशीदरम्यान, ती गाडी लक्ष्मीदेवीचा जावई डॉ. रामचंद्र याची होती, असं समोर आलं. डॉ. रामचंद्र पेशाने डेन्टिस्ट असून त्यालाच या हत्येचा सूत्रधार म्हटलं जात आहे.
गाडीमध्येच केली हत्या
पोलिसांनी डॉ. रामचंद्र आणि त्याचे दोन साथीदार सतीश आणि किरण यांना अटक केली आहे. या तिघांनी मिळून ही निर्घृण हत्येचा कट रचला होता. 3 ऑगस्ट रोजी लक्ष्मीदेवीला बळजबरीनं गाडीत बसवण्यात आलं आणि नंतर त्याच गाडीत तिची गळा दाबून हत्या करण्यात आली.
हे ही वाचा: दोघींना स्विमिंग पूलजवळ नेलं अन् सामूहिक अत्याचार... निष्पाप मुलींसोबत घडलं भयानक...
हत्येनंतर, आरोपींना मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची एक भयानक योजना आखली. त्यांनी लक्ष्मी देवीच्या शरीराचे तुकडे केले आणि हे तुकडे कोरटगेरेच्या वेगवेगळ्या परिसरात टाकले जेणेकरून कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही. 11 ऑगस्टच्या रात्री तिन्ही आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी, 12 ऑगस्ट रोजी त्यांना मेजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आलं.
ADVERTISEMENT
