Crime news : देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला स्वत:च्याच घरात सुरक्षित नसल्याच्या अनेक बातम्या वृत्तमाध्यमातून समोर येऊ लागल्या आहेत. तर अनेकदा भररस्त्यात महिलांवर, मुलींवर लैंगिक शोषण केले जाते. तसेच महिलांचा छळही होतो, अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी गुरूग्राममध्ये घडली होती. एका अभिलाष नावाच्या (32) वर्षीय तरुणाने एका मुलीला पाहून भररस्त्यातच हस्तमैथुन केल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. आता त्याच अभिलाषला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो गुरूग्राममधील एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नात्याला काळिमा! लेकाचा स्पर्म काऊंट कमी असल्याने पाळणा हालेना, आधी सासऱ्याने सूनेवर नंतर नणंदेच्या नवऱ्याने आळीपाळीने...
पोलीस प्रवक्ते एएसआय संदीप यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीतून असे उघडकीस आले की, आरोपी हा गेल्या एका वर्षांपासून गुरूग्राम येथील सेक्टर 11 येथील रहिवासी आहे. त्याने गुरूग्राम येथून एका खासगी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं होतं. त्याला 14 लाखांचं पॅकेज असल्याचं तपासातून समोर आलं. तो पोलिसांच्या ताब्यात असल्याने पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
नेमकं काय घडलं?
सोशल मिडिया एन्फ्ल्युएंसर आपलं काम करून घरी परतl होती. तेव्हा ती गुरूग्राममध्ये एका कॅबची वाट पाहत होती. कॅबची वाट पाहत असताना तिथे अभिलाष आला आणि त्याने पुढचा मागचा विचार न करता भररस्त्याच पँटची चैन खोलली आणि अश्लील चाळे करू लागला होता. हे सर्व पाहून घटनास्थळी असलेली पीडित तरुणी ओशाळली.
हे ही वाचा : मोठी बातमी: बच्चू कडूंना 'ते' प्रकरण अखेर भोवलं, कोर्टाने सुनावली मोठी शिक्षा!
आपल्याकडे काहीतरी पुरावा असावा यासाठी तिने मोबाईलद्वारे व्हिडिओ शूट केला. तिने पोलिसांकडेही मदत मागितली होती, पण पोलिसांनी तिला ऐनवेळी मदत केली नाही. पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात येऊन लिखित स्वरुपात तक्रार दाखल करून घ्यावी, असे सांगितले. पुराव्यासाठी पीडितेनं तरुणाने केलेले अश्लील चाळे मोबाईलमध्ये कैद केले. त्यानंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित परिस्थिती पाहून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ADVERTISEMENT
