Rape Case: उत्तराखंडच्या ऊधम सिंह नगरमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र आजोबाकडून बलात्कार झाल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. इतकेच नव्हे, तर आरोपीची नात त्यानंतर गरोदर राहिली आणि पीडितेने एका मुलीला जन्म दिला. पीडिता अल्पवयीन असल्याकारणाने तिने जन्म दिलेल्या मुलीला कोणा दुसऱ्याकडे दत्तक देण्यात आलं. घाबरत घाबरत पीडितेने तिच्यासोबत घडलेल्या घाणेरड्या कृत्याबद्दल तिच्या सावत्र आईला सांगितलं. पोलिसांनी आरोपी आजोबाला ताब्यात घेऊन त्याची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली.
ADVERTISEMENT
आजोळी गेल्यानंतर पीडितेसोबत बनवले संबंध...
अल्पवयीन पीडितेच्या काकाने या प्रकरणाबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पीडितेच्या काकांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या मोठ्या भावाची पहिली बायको त्यांच्या सोडून गेली. भावाची एक मुलगी असून तिचं पालनपोषण करण्यासाठी त्यांनी दुसरं लग्न केलं. त्यानंतर, काही दिवसांनी दुसरी पत्नी सुद्धा अचानक आजारी पडली आणि त्या काळात मुलीला सोबत घेऊन ती माहेरी निघून गेली. मात्र, तिथे तिच्या 70 वर्षीय सावत्र आजोबाने तिला धमकावून, घाबरवून बळजबरीने तिच्यासोबत संबंध बनवले.
हे ही वाचा: डॉक्टर जावयाने सासूसोबत केलं निर्घृण कृत्य! बळजबरीने कारमध्ये बसवलं अन् गळा दाबून संपवलं, मृतदेहाचे तुकडे अन्...
पीडितेच्या काकांनी केले आरोप
प्रकरणाची माहिती देताना काकांनी सांगितलं की " आजोबाच्या घृणास्पद कृत्यामुळे माझी पुतणी गरोदर राहिली आणि त्या काळात तिला आमच्याकडे पाठवण्यात आलं नाही. त्यामुळे तिच्या गरोदरपणा बद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हतं. नंतर तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिच्या हैवान आजोबाने ती मुलगी कोणालातरी दत्तक दिली."
हे ही वाचा: दोन मुलांच्या विधवा आईचा बॉयफ्रेंडसोबत रोमान्स! अचानक मुलाने सगळंच पाहिलं अन् नंतर घडलं...
आरोपीला कठोरातली कठोर शिक्षेची मागणी
पोलिसांनी घटनेची तक्रार दाखल करुन 70 वर्षीय वृद्ध आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर, आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं आणि तिथून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. तसेच, सावत्र आजोबाच्या या घृणास्पद कृत्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. कोणी स्वतःच्या नातीसोबत असं क्रूर कृत्य कसं काय करू शकतं? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी पीडितेच्या कुटुंबियांनी मागणी आहे. तसेच, नवजात बाळाला दत्तक घेण्यासाठी ज्या लोकांना बाळ देण्यात आलं, त्यांचाही शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT
