जळगाव हादरलं ! कॅफेत मैत्रिणीसोबत बसला सुलेमान, जमाव आला अन् गुरासाखं मारलं, आई-वडील सोडवायला गेले अन्...

Jalgaon Crime : पुरोगामी महाराष्ट्रातील जळगावात काळीज पिळवटून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 21 वर्षीय तरुण सुलेमान रहीम पठाणला काही जमावाने बेदम मारहाण केली, नेमकं काय घडलंय जाणून घ्या.

Jalgaon Crime

Jalgaon Crime

मुंबई तक

14 Aug 2025 (अपडेटेड: 14 Aug 2025, 12:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जळगाव हादरलं

point

तरुण-मुलगी दोघेही गप्पा मारत होते

point

जमावाकडून तरुणाला बेदम मारहाण

point

नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : पुरोगामी महाराष्ट्रातील जळगावात काळीज पिळवटून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 21 वर्षीय तरुण सुलेमान रहीम पठाणला काही जमावाने बेदम मारहाण केली. सुलेमानचे एका अल्पवयीन तरुणीशी मैत्री होती. ते दोघेही एका कॅफेत गप्पा मारत बसले होते. तेव्हा त्या ठिकाणी एक जमाव आला आणि त्याने सुलेमानला बेदम मारहाण केली. सुलेमानला त्या कॅफेतून बाहेर काढले आणि नंतर गावात नेलं असता, गुरासारखी मारहाण केली. त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आठ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मित्राने तरुणीला पार्टीला बोलावले, नंतर दारूत मिसळले औषध, तिला बाथरूममध्ये नेलं अन् आळीपाळीने सर्वांनीच...

हादरून टाकणारं प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलेमान रहीम खान पठाण हा सोमवारी सकाळी त्याच्या बेटाबाड या गावातून जामनेरकडे निघाला होता. त्याला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा होता. त्याच दिवशी दुपारच्या सुमारास सुलेमान आपल्या मैत्रिणीसोबत एका कॅफेत बसले होते. तेव्हा आठ-दहा जणांचा जमाव तिथे आला आणि त्यांनी मोबाईल घेतला असता, त्यात त्या दोघांचे फोटो दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर त्यांनी सुलेमानला बेदम मारहाण केली.

गावातून धिंडं

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सुलेमानला त्याच्याच गावी नेले असता, जबर मारहाण केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, पीडित मुलाची आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी गेली असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर सुलेमान बेशुद्ध पडला. आरोपीने सुलेमानचा मृत्यू झाल्याचं समजून त्याला त्याच्या घराबाहेर सोडले. तेव्हा गावातील लोक त्यांना रुग्णालयात घेऊन गेले, तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नंतर सुलेमानच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह सुलेमानच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला.

हे ही वाचा : ऑगस्टमध्ये शनि-शुक्र केंद्र योग, शनिची हालचाल आणि काही राशीतील लोकांच्या आयुष्याला कलाटणी

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींच्या मसुक्या आवळल्या आहेत. यातील चार जणांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. 18 ऑगस्ट रोजी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. हल्लेखोरांमध्ये अभिषेक राजकुमार रजपूत (22), घनश्याम उर्फ बिहारी लाल शर्मा (25), दीपक बाजीराव (20) और रंजत उर्फ रणजीत रामकृष्ण मटाडे (48) यांचा समावेश होता. तसेच जामनेरचे पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी अटकेची पुष्टी केली आणि सांगितले की, आदित्य देवडे, कृष्णा तेली, शेजवाल तेली आणि ऋषिकेश तेली हे सर्व सुमारे २० वर्षांचे आहेत. या सर्वांना बुधवारी जळगावातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली.

    follow whatsapp