बालपणीच्या मित्राच्या पत्नीसोबत होतं लफडं..30 वर्षांच्या Friendship चा सर्वात भयंकर शेवट, मर्डर मिस्ट्री वाचून थरकापच उडेल

Shocking Murder Case Viral News :  बंगळुरुमध्ये सर्वात भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीची हत्या त्याच्या बालपणीच्या मित्रानेच केली आहे.

Extra Marital Affaire Shocking News

Extra Marital Affaire Shocking News

मुंबई तक

• 02:37 PM • 13 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

त्या व्यक्तीचं मित्राच्या पत्नीसोबत सुरु होतं अफेअर

point

पत्नी आणि मित्राने रचला हत्येचा कट

point

काही क्षणातच संपवली बालपणीची मैत्री

Shocking Murder Case Viral News :  बंगळुरुमध्ये सर्वात भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीची हत्या त्याच्या बालपणीच्या मित्रानेच केली आहे. या हत्येमागचं कारण उघड झाल्यावर अनेकांना धक्काच बसला आहे. 30 वर्षांची मैत्री एका मिनिटातच संपवण्यात आली. पीडित व्यक्तीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याने हा हत्याकांड घडला. 39 वर्षीय विजय कुमार आणि त्यांचे बालपणीचे मित्र धनंजय (जय) यांच्यात घट्ट मैत्रीचे संबंध होते. दोघांनीही एकत्रित शिक्षण घेतलं आणि बंगळुरुत सेटल्ड झाले.  

हे वाचलं का?

त्या व्यक्तीचं मित्राच्या पत्नीसोबत सुरु होतं अफेअर

विजयचं लग्न जवळपास 10 वर्षांपूर्वी आशासोबत झाला होता. पण काही दिवसांपूर्वी विजयला माहित झालं की, बालपणीच्या मित्रासोबत त्याच्या पत्नीचं अफेअर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विजयने दोघांनाही रंगेहाथ पकडलं. त्यानंतर त्या दोघांचे विचित्र फोटोही मिळाले होते. नातं टीकवण्यासाठी विजयने पत्नीसोबत भाड्याच्या घरात राहायचं ठरवलं. पण त्यांच्यातील अंतर्गत वाद संपला नाही. 

हे ही वाचा >> दोघींना स्विमिंग पूलजवळ नेलं अन् सामूहिक अत्याचार... निष्पाप मुलींसोबत घडलं भयानक...

पत्नी आणि मित्राने रचला हत्येचा कट

ज्या दिवशी घटना घडली, त्या दिवशी विजय संध्याकाळपर्यंत घरीच होता. पण काही वेळानंतर त्याचा मृतदेह माछोहल्ली के डी-ग्रुप लेआऊटमध्ये आढळला. पोलिसांचं म्हणणं आहे की, आशा आणि धनंजयने मिळून हत्येचा कट रचला. प्राथमिक तपासात समोर आलं की, दोन अज्ञात हल्लेखोरांनी माछोहल्ली क्रॉस जवळ हा हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आशाला ताब्यात घेतलं आहे. तर धनंजय फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

काही क्षणातच संपवली बालपणीची मैत्री

विजयची हत्या त्याच्या बालपणीच्या मित्राने केली. ज्यामुळे त्याचे पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. पीडित विजय कुमार आणि आरोपी धनंजय उर्फ जय तीन दशकांपासून जवळचे मित्र होते. बंगळुरुच्या मगदीमध्ये त्यांनी सोबत शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर ते सुंकदकट्टेमध्ये राहायला लागले. विजयने दहावर्षांपूर्वी आशासोबत लग्न केलं होतं आणि दोघेही कामाक्षीपाल्या येथे राहत होते. 

हे ही वाचा >> लेकीच्या संसारात सासू करायची लुडबुड, अखेर जावयाची सटकली, मटण तोडल्यासारखे केले 19 तुकडे, पोलिसांचीही टरकली

    follow whatsapp