22 वर्षांची शिक्षिका, 16 वर्षांचा विद्यार्थी अन् दोघांमधील प्रेमसंबंध... पण, 'या' प्रेमकहाणीतून घडली भयानक घटना!

22 वर्षीय शिक्षिकेचे तिच्या शाळेतील 16 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. त्यानंतर, पोलिसांना संबंधित प्रकरणाबाबत सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या.

'या' प्रेमकहाणीतून घडली भयानक घटना!

'या' प्रेमकहाणीतून घडली भयानक घटना!

मुंबई तक

• 07:00 AM • 24 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

22 वर्षांच्या शिक्षिकेचे 16 वर्षीय विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध

point

'या' प्रेमकहाणीतून घडली भयानक घटना!

Crime News: 1990 मध्ये घडलेल्या या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. 1 मे 1990 रोजी 24 वर्षीय ग्रेग स्मार्ट नावाच्या तरुणाचा न्यू हॅम्पशायरमधील त्याच्या घरातच मृतदेह सापडला. त्याच्या डोक्यात लागलेल्या गोळीवरून ही सामान्य घटना नसल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणाचा तपासादरम्यान, पोलिसांचं लगेच ग्रेगची सर्वात जवळची व्यक्ती म्हणजेच त्याची 22 वर्षीय पत्नी पामेला स्मार्टकडे लक्ष गेलं. 

हे वाचलं का?

ही कहाणी जवळपास 39 वर्षांपूर्वीची आहे. 1986 मध्ये पामेला कॉलेजमध्ये शिकत असताना एका म्यूझिक इव्हेंटमध्ये तिची ग्रेगसोबत भेट झाली. त्या भेटीनंतर, त्यांच्यात बोलणं वाढत गेलं आणि काही दिवसांतच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. फायनल इअर म्हणजेच शेवटच्या वर्षाचं शिक्षण घेत असताना, ते काही महिने फ्लोरिडामध्ये एकत्र राहिले. त्यानंतर, न्यू हॅम्पशायरला परतले आणि त्यांनी एक घर विकत घेतलं. 1989 मध्ये त्या दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं. ग्रेग एक विमा एजंट म्हणून काम करत होता आणि पामेला जवळच्या शाळेत मीडिया कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत होती. मात्र, त्यांचं आयुष्य अगदी आनंदी वाटत असलं तरी कोणत्या तरी कारणावरून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होत होता. 

पत्नीने फोन करून पोलिसांना दिली माहिती 

1 मे 1990 च्या संध्याकाळी, पामेलाने पोलिसांना फोन केला आणि तिच्या घरात चोरी झाल्याची तक्रार तिने दाखल केली. तसेच, एका ड्रग्ज एडिक्ट (व्यसनी) व्यक्तीने तिच्या पतीचा पैशांसाठी खून केल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. ग्रेग त्याच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळला. तपासादरम्यान, ग्रेगची पत्नी पामेलाचा खरा चेहरा उघडकीस येऊ लागला. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: सेकंड क्लास तिकीटाला AC लोकलचा पास बनवला... प्रवाशाचा कारनामा पाहून रेल्वे कर्मचारी सुद्धा गोंधळले!

शाळेतील विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध 

पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असता पामेलाचे तिच्या शाळेतील 16 वर्षांच्या विल्यम बिली फ्लिन नावाच्या विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. त्यानंतर, पोलिसांना या घटनेबाबत सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या आणि पामेलाच्या प्रेमसंबंधातूनच ग्रेगची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. पोलिसांनी, बिली आणि त्याच्या तीन मित्रांना अटक करण्यात आली असून यासंबंधी आता खटला सुरू झाला.

हे ही वाचा: मुंबई: राहत्या फ्लॅटवरून जोडप्यात वाद! संतापलेल्या पतीने बायकोच्या डोक्यात दगड घातला अन्...

सुनावणीदरम्यान, बिलीने न्यायालयात एक धक्कादायक विधान केलं. तो म्हणाला, "मी गोळी झाडली, पण मी हे पामेलाच्या सांगण्यावरून केलं." त्याने असंही म्हटले की पामेलाने तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर ती तिची सर्व प्रॉपर्टी गमवून बसेल, अशी तिला भिती होती, त्यामुळे तिनेच हा सगळा कट रचला आणि मला ग्रेगवर गोळी झाडण्यास सांगितलं. त्यावेळी, पामेलाने न्यायालयात तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, बिलीच्या तीन मित्रांनी सुद्धा पामेलाच्या विरोधात साक्ष दिली.

न्यायालयात सादर केलेल्या सर्व पुरावे आणि जबाबांच्या आधारे, पामेलाला 1991 मध्ये खून करण्याचा कट रचल्याबद्दल आणि इतर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आलं.

    follow whatsapp