मुंबईची खबर: सेकंड क्लास तिकीटाला AC लोकलचा पास बनवला... प्रवाशाचा कारनामा पाहून रेल्वे कर्मचारी सुद्धा गोंधळले!

मुंबई तक

एका प्रवाशाने ग्राफिक डिझायनिंगच्या मदतीने 15 रुपयांच्या नॉन-एसी लोकल तिकिटाचं 2,205 रुपयांच्या एसी लोकल पासमध्ये रूपांतर केलं.

ADVERTISEMENT

सेकंड क्लास तिकीटाला AC लोकलचा पास बनवला...
सेकंड क्लास तिकीटाला AC लोकलचा पास बनवला...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सेकंड क्लास तिकीटाला AC लोकलचा पास बनवला...

point

प्रवाशाचा कारनामा पाहून रेल्वे कर्मचारी सुद्धा गोंधळले!

Mumbai News: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये तिकिटाशिवाय प्रवास करणारे बरेच प्रवासी आपण पाहतो. तसेच, सेकंड क्लासचं तिकीट घेऊन रेल्वेच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्यांची सुद्धा असंख्य प्रकरणे नोंदवली जात असतात. मात्र, आता असं एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे रेल्वेच्या तिकीट चेकिंग स्टाफला सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रवाशाने ग्राफिक डिझायनिंगच्या मदतीने 15 रुपयांच्या नॉन-एसी लोकल तिकिटाचं 2,205 रुपयांच्या एसी लोकल पासमध्ये रूपांतर केलं. आता, पश्चिम रेल्वेने बोरिवली जीआरपीसह आरोपीवर कारवाई केली असून त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. 

एका महिन्यात फसवणूकीची प्रकरणे उघडकीस 

खरं तर,  पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी या एका महिन्यात (ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025) तिकीट फसवणुकीची बरीच प्रकरणे उघडकीस आणली आहेत. यामध्ये, बनावट रिझर्व्हेशन तिकिटे, कन्सेशन तिकिटांचा गैरवापर आणि बनावट तिकिटे यांचा समावेश आहे. सरकारी रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) मदतीने या सर्व प्रकरणांवर कठोर कारवाई केली असून तिकीट तपासणी कर्मचारी प्रदीप कुमार, मोहम्मद कुरेशी, अब्दुल अझीझ आणि साई प्रसाद यांनी हे प्रकरणे उघडकीस आणण्यात मुख्य भूमिका राहिली आहे. 

हे ही वाचा: मुलीची तब्येत बिघडल्याने घरी मांत्रिकाला बोलवलं, नंतर बंद खोलीत पीडितेचे कपडे काढले अन् अर्धा तास...

920 रुपयांचे तत्काळ तिकीट 2,900 रुपयांना खरेदी

रेल्वे अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, एका दुसऱ्या प्रकरणात प्रवाशाने अधिकृत एजंटकडून 920 रुपयांचे तत्काळ तिकीट 2,900 रुपयांना खरेदी केलं होतं. तिकिटावर वॉटरमार्क नव्हता आणि ते बनावट तिकीट स्पष्ट झालं. या प्रवाशाला बोरिवली स्थानकावर पकडण्यात आलं आणि त्याला लगेच जीआरपीच्या ताब्यात देण्यात आलं. 

हे ही वाचा: मुंबई: राहत्या फ्लॅटवरून जोडप्यात वाद! संतापलेल्या पतीने बायकोच्या डोक्यात दगड घातला अन्...

अशाच एका तिसऱ्या प्रकरणात, दोन अपंग नसलेल्या व्यक्तींना एक्स्प्रेस ट्रेनच्या थर्ड- एसी (3AC) ट्रेनमध्ये प्रवास करताना पकडण्यात आलं. खरं तर, त्यांची तिकीटे ही अपंग कोट्याअंतर्गतच काढली गेली होती. ही तिकिटे ऑनलाइन जारी करण्यात आली. इचकेच नव्हे तर, आणखी एका प्रकरणात, ग्राफिक डिझायनिंगच्या मदतीने लोकल ट्रेनचे तिकीट एडिट करण्यात आलं होतं. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp