इंस्टाग्रामवरून तरुणीशी मैत्री, लेफ्टनंट अधिकारी ओळख सांगत तिच्या घरी गेला, अन्नात नशेचे पदार्थ मिसळून नको तेच...

Sexully Abused : तरुणाने एका महिला डॉक्टरचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोघांचीही इंस्टग्रामवर ओळख झाली आणि त्यांच्या ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाले.

sexually abused

sexually abused

मुंबई तक

• 07:00 AM • 28 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय लेफ्टनंट ओळख सांगत पीडितेवर लैंगिक शोषण 

point

दोघांचीही इंस्टाग्रामवर ओळख आणि नंतर मैत्री

Sexully Abused : एका तरुणाने एका महिला डॉक्टरचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोघांचीही इंस्टग्रामवर ओळख झाली आणि त्यांच्या ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाले. संबंधित तरुणाने आपण भारतीय लेफ्टनंट असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तरुण महिला डॉक्टरच्या घरी भेटण्याच्या बहाण्याने गेला. तेव्हा त्याने अन्नात नशेचे पदार्थ मिसळून तिचं लैंगिक शोषण केलं. ही घटना दिल्लीतील छत्तरपूर येथे घडली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : महिलेचा शारिरीक छळ, साताऱ्यातील विवाहितेनं घेतला गळफास, शवविच्छेदनाच्या अहवालाबाबत आईचा धक्कादायक दावा

आरोपीचे पीडितेवर लैंगिक शोषण 

आरोपीने पीडितेवर लैंगिक शोषण केल्याने तरुणीने सफदरगंज एन्क्लेव्ह पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. याचपार्श्वभूमी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी आरवला त्याच्या छतपूर येथील घरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय महिला डॉक्टर दक्षिण दिल्लीत भाड्याच्या घरात राहत होती. 

दोघांचीही इंस्टाग्रामवर ओळख आणि नंतर मैत्री

इंस्टाग्रामवर तिची ओळख ही आरव नावाच्या तरुणाशी झाली. त्यानंतर ओळखीतूनच दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झाले. ते एकमेकांशी व्हॉट्सअॅपवरून बोलू लागले होते. पीडितेनं तक्रारीत म्हटलं की, आरोपीने  भारतीय लेफ्टनंट अशी आपली ओळख सांगितली. 

हे ही वाचा : आधी जीवापाड प्रेम, नंतर विश्वासघात, 'त्या' कारणावरून गर्लफ्रेंडने तरुणावर ओतलं तेल, UPSC च्या विद्यार्थ्याला संपवलं

दरम्यान, दिल्लीत महिलांवरील अन्याय आणि लैंगिक शोषणाच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. दिल्लीतील निर्भया हे प्रकरण आजही अनेकांना आठवते. यामुळे आता दिल्लीतील कायदा आणि सुरक्षेवर प्रश्न उपस्थित राहतात. 

    follow whatsapp