Delhi Crime : दिल्ली विद्यापीठाच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आहे. ही घटना दिल्लीतील लक्ष्मीबाई विद्यालयाजवळ रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या कॉलेजला जात असताना तिच्यावर हा अॅसिड हल्ला करण्यात आला. एक गोष्ट चांगली की, पीडितेनं आपला चेहरा वाचवण्यास यश मिळवलं, पण तिच्या हाताला भाजलं गेलं. जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : आजपासून मंगळ ग्रहाचे महागोचर योग, 'या' राशींना अस्थिरतेचे संकेत मिळणार
पीडितेवर अॅसिड हल्ला, नेमकं काय घडलं?
जेव्हा पीडितेवर अॅसिड हल्ला करण्यात आला तेव्हा त्या हल्ल्यानंतर लगेचच, उपस्थितांनी मुलीला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि तिला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात सांगितलं की पीडितेच्या हातांना दुखापत झाली आहे, सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. संबंधित प्रकरणात दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, मुकुंदपूरातील 20 वर्षीय महिलेवर अॅसिड हल्ला झाल्याची तक्रार करण्यात आली. पीडितेनं सांगितलं, ती दुसऱ्या वर्षाची महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. ती विद्यापीठात जाताना, त्याचक्षणी तिचा ओळखीचा तरुण जितेंद्रसोबत मित्र इशान आणि अरमान मोटारसायकलवरून आले होते.
आरोपींवर गुन्हा दाखल
या प्रकरणात असा आरोप करण्यात आला आहे की, इशानने अरमानला एक बाटली दिली, तेव्हा तिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. पीडितेनं त्याचक्षणी तिचा चेहरा कस बसा वाचण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तिचे दोन्ही हात भाजले गेले होते. पीडितेच्या म्हणण्यांनुसार, जितेंद्र तिचा पाठलाग करत होता आणि सुमारे एक महिन्यांपूर्वी त्यांच्यात जोरदार वाद झाला. तेव्हा एफएसएल पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पीडितेनं दिलेल्या जाबाबानुसार आणि तिच्यावर करण्यात आलेल्या अॅसिड हल्ल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा : ऑनलाईन गेमच्या नादाने कर्जबाजारी, बार्शीतील 32 वर्षीय तरुणाची आत्महत्या; कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंब उद्धवस्त
घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसराची अनेक पोलीस पथकांनी चौकशी केली, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींची तपासणी केली जात आहे. आरोपीने केलेल्या या अॅसिड हल्ल्यामागे नेमका काय हेतू होता, याचा पोलीस शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT











