आजपासून मंगळ ग्रहाचे महागोचर योग, 'या' राशींना अस्थिरतेचे संकेत मिळणार
Astrology : मंगळ ग्रह 27 ऑक्टोबर रोजी संक्रमण करणार आहे. मंगळ ग्रहाचे हे संक्रमण महत्त्वाचे असणार आहे. कारण मंगळ ग्रह हा वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या एकूण हालचालीचा अनेक राशीवर बदल निर्माण घडून येणार आहे.
ADVERTISEMENT

1/6
ग्रहांचा अधिपती म्हणून मंगळ ग्रहाची ओळख आहे. हाच मंगळ ग्रह 27 ऑक्टोबर रोजी संक्रमण करणार आहे. मंगळ ग्रहाचे हे संक्रमण महत्त्वाचे असणार आहे. कारण मंगळ ग्रह हा वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या एकूण हालचालीचा अनेक राशीवर बदल निर्माण घडून येणार आहे.

2/6
कुंडलीत मंगळाची मजबूत स्थिती व्यक्तीला निर्भर बनवते. 27 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या संक्रमणाच्या काही पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

3/6
धनु राशी :
या एकूण बदलाचा किंवा संक्रमणाचा धनु राशीतील लोकांवर परिणाम होईल. धनु राशीतील लोकांची मानसिक शांती भंग होईल. आर्थिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. काही शुल्लक गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे.

4/6
मेष राशी :
मेष राशीतील लोकांचा याच काळात आत्मविश्वास आणि अहंकार वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा, तसेच वाहन चालवताना काळजी घ्यावी.

5/6
वृषभ राशी :
या राशीतील लोकांच्या खर्चात अचानकपणे वाढ होण्याची शक्यता आहे. जुनी केलेली गुंतवणूक परत मिळणे कठीण होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी.

6/6
कर्क राशी :
या राशीतील लोकांचे कामाच्या ठिकाणी वातावरण प्रतिकूल असण्याची शक्यता आहे. तसेच वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मानसिक तणावामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.









