ऑनलाईन गेमच्या नादाने कर्जबाजारी, बार्शीतील 32 वर्षीय तरुणाची आत्महत्या; कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंब उद्धवस्त

मुंबई तक

Barshi Crime : ऑनलाईन गेमच्या नादाने कर्जबाजारी, बार्शीतील 32 वर्षीय तरुणाची आत्महत्या; कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंब उद्धवस्त

ADVERTISEMENT

Barshi Crime
Barshi Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑनलाईन गेमच्या नादाने कर्जबाजारी झाला

point

बार्शीतील 32 वर्षीय तरुणाची आत्महत्या

point

कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंब उद्धवस्त

गणेश जाधव, Barshi Crime : सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातील कुसळंब गावातील एका तरुणाने ऑनलाइन गेमच्या व्यसनाने कर्जबाजारी झाल्यानंतर  आयुष्य संपवले आहे. चक्री गेमच्या नादात कर्जाचा डोंगर झाल्याने समाधान तुकाराम ननवरे (वय 32) या तरुणाने शुक्रवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ऑनलाइन गेमच्या जुगाराने आणखी एक बळी घेतलाय. 

मिळालेल्या माहितीनुसार, समाधान ननवरे हे गेल्या सात वर्षांपासून बार्शीतील शिवाजीनगर भागात ‘डायमंड सलून’ या नावाने व्यवसाय करत होते. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांना मोबाईलवरील चक्री गेमचे व्यसन लागले. सुरुवातीला केवळ मनोरंजन म्हणून सुरू झालेला हा गेम नंतर जुगाराच्या व्यसनात रुपांतरीत झाला. तो रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळत असे — कधी लाख रुपये जिंकायचा, तर दुसऱ्या दिवशी दोन लाख रुपयांचे नुकसान करत असे. या व्यसनामुळे समाधानने मित्र, नातेवाईक, पतसंस्था, बँका आणि खासगी सावकार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उसने घेतले. इतकेच नव्हे तर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरूनही कर्ज घेऊन त्याने गेममध्ये पैसे गुंतवले. घरच्यांनी वारंवार समजावून सांगूनही तो थांबला नाही.

दरम्यान, 24  ऑक्टोबरच्या रात्री समाधानची पत्नी व मुलगा दिवाळी निमित्त ढोकी येथ माहेरी गेली होती. यावेळी त्याने आई व बहिणींसोबत जेवण केले आणि गप्पा मारल्या आणि त्यानंतर साडेअकराच्या सुमारास दुसऱ्या खोलीत झोपायला गेला. पहाटे आई सीताबाई ननवरे उठल्या असता पाणी तापवण्यासाठी जाताना समाधानने स्लॅबवरील लोखंडी हुकाला गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केल्यावर घरच्यांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा : रत्नागिरीमध्ये लाचखोर ट्रॅफिक पोलीस पैसे घेऊन टपरीवाल्याकडे द्यायचा, तरुणांनी कसा केला पर्दाफाश?

हे वाचलं का?

    follow whatsapp