रत्नागिरीमध्ये लाचखोर ट्रॅफिक पोलीस पैसे घेऊन टपरीवाल्याकडे द्यायचा, तरुणांनी कसा केला पर्दाफाश?
Ratnagiri news the traffic police took bribes : रत्नागिरीमध्ये ट्रॅफिक पोलीस लाच घेऊन टपरीवाल्याकडे द्यायचा, तरुणांनी कसा केला पर्दाफाश?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रत्नागिरीमध्ये ट्रॅफिक पोलीस लाच घेऊन टपरीवाल्याकडे द्यायचा
तरुणांनी कसा केला पर्दाफाश?
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात वाहतूक पोलिसांच्या गैरप्रकाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आठवडा बाजार परिसरात एका वाहतूक पोलिसाने वाहनचालकांकडून बेकायदेशीररीत्या दंड वसूल करून ती रक्कम एका टपरीवाल्याकडे जमा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश काही जागरूक तरुणांनी केला असून त्यांनी या घटनेचा व्हिडिओ काढून करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येतं की, संबंधित नागरिक वाहतूक पोलिसाला लाचखोरीबाबत प्रश्न विचारताना दिसत आहेत. शिवाय टपरीवाल्याने देखील याबाबतची कबुली दिली आहे. संबंधित वाहतूक पोलीस वाहनचालकांकडून रोख रक्कम घ्यायचा आणि माझ्याकडे जमा करायचा, असं टपरीवाल्याने पोलिसासमोर सांगितलं आहे. टपरीवाल्याच्या खुलाशानंतर नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
वाहतूक शिस्त राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातीलच काही कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारे लाचखोरी केली जात असल्याने संपूर्ण पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या घटनेमुळे रत्नागिरी पोलिसांची प्रतिमा पुन्हा एकदा मलिन झाल्याचं नागरिकांचे म्हणणं आहे.










