प्रियकराच्या प्रेमात जीव झाला वेडापीसा, पोरा-बाळांना सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, नवऱ्याने विष पिलं अन्...

Crime News : प्रियकराच्या प्रेमात जीव झाला वेडापीसा, पोरा-बाळांना सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेली, नवऱ्याने विष पिलं अन्...

Crime News

Crime News

मुंबई तक

27 Oct 2025 (अपडेटेड: 27 Oct 2025, 01:50 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकराच्या प्रेमात जीव झाला वेडापीसा

point

पोरा-बाळांना सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेली

point

नवऱ्याने विष पिऊन आयुष्य संपवलं

Crime News : उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका वकिलाची पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेचा पतीला धक्का बसला आणि त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. एवढंच नव्हे तर पतीने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठीही लिहून ठेवली आहे, ज्यात त्याने नमूद केले आहे की “माझ्या मुलांना माझ्या पत्नीच्या ताब्यात देऊ नका.” पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

ही घटना बरेलीतील कॅन्ट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. बरेलीतील एका वकिलाचा विवाह सुमारे आठ वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन लहान मुलं आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्या वकिलाच्या पत्नीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे. नातेवाईकांनी तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकण्यास तयार नव्हती. काही दिवसांपूर्वी ती अचानक घरातून बेपत्ता झाली. सुरुवातीला कुटुंबीयांना वाटले की ती माहेरी गेली असेल, पण तेथेही ती न मिळाल्याने पतीने शोध सुरू केला. अखेर समजले की ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. हे समजताच वकिलाचं मानसिक संतुलन बिघडलं.

हेही वाचा : "सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या जावयाने शिक्षकाच्या नावावर कर्ज काढलं, नंतर भरण्यास नकार दिला; शिक्षकाने विष घेतलं"

"माझ्या मुलांना तिच्याकडे देऊ नका", वकिलाने लिहिली सुसाईड नोट 

पत्नी पळून  गेल्यानंतर वकील प्रचंड नैराश्यात गेला. त्याने घरातच विष घेतलं. नातेवाईकांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान डॉक्टरांना त्याच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली. त्यात लिहिलं होतं  “आता मी जगू शकत नाही. जिच्या कारणामुळे मला आणि माझ्या मुलांना फसवणूक सहन करावी लागली, तिला माझ्या मुलांच्या जवळ जाऊ देऊ नका.” ही चिठ्ठी वाचून कुटुंबातील लोक आक्रोश करून रडू लागले. पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांचा तपास सुरू, मुलांचं भविष्य अंधारात

पोलिसांच्या माहितीनुसार हा संपूर्ण प्रकार कौटुंबिक वादातून निर्माण झालेला आहे. वकिलाची पत्नी आणि तिचा प्रियकर दोघेही सध्या फरार आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. कॅन्ट पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितले की वकील सध्या रुग्णालयात असून बोलण्याच्या स्थितीत नाही. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला जाणार आहे.

कुटुंबियांनी पोलिसांकडे केली विनंती

दरम्यान, वकिलाचे पालक आणि नातेवाईक मुलांच्या भवितव्याची चिंता करत आहेत. “मुलाचा जीव धोक्यात आहे, त्याची अवस्था पाहून आमचं मन तुटतं,” असं वडिलांनी सांगितलं. त्यांनी पोलिसांना विनंती केली आहे की पत्नी आणि तिचा प्रियकर यांना लवकरात लवकर अटक करावी.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मृतदेहांची अदलाबदल पोलिसांमुळे? खारगरमधील आत्महत्या केलेल्या तरुणाच्या मृतदेहावर भलत्याच कुटुंबाकडून अंत्यसंस्कार
 

    follow whatsapp