आधी जीवापाड प्रेम, नंतर विश्वासघात, 'त्या' कारणावरून गर्लफ्रेंडने तरुणावर ओतलं तेल, UPSC च्या विद्यार्थ्याला संपवलं

मुंबई तक

Delhi Crime : युपीएससीची परीक्षा देणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उलगडला आहे. गर्लफ्रेंडने आपल्या लिव्ह इन पार्टनरसोबत असं का केलं, याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Delhi Crime
Delhi Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गर्लफ्रेंडने युपीएससीची परीक्षा देणाऱ्या तरुणाची हत्या केली

point

नेमकं काय घडलं?

Delhi Crime : दिल्लीच्या गांधी विहार परिसरात युपीएससीची परीक्षा देणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उलगडला आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव रामकेश मीणा (वय 32) असे आहे. दिल्लीचे डीसीपी राजा बंटीया यांनी सांगितलं की, या हत्येप्रकरणी रामकेशचा लिव्ह-इन पार्टनर, त्याची मैत्रीण, फॉरेन्सिक्सचा विद्यार्थी आणि तिच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली. अटकेत असलेल्याची नावे समोर आली आहेत, अमृता चौहान (वय 21), सुमित कश्यप (वय 27) आणि संदीप कुमार (वय 29) अशी आरोपींची नावे असून त्याला उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून अटक करण्यात आले. 

हे ही वाचा : वडिलांकडून लेकीवर पाच महिने लैंगिक शोषण, लेकाचा थेट बापावर गोळीबार करत कुऱ्हाडीने हल्ला

प्रियकराने तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो लॅपटॉपमध्ये केले कैद 

अमृता चौहानचा आरोप आहे की, मृत राकेशनने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले होते आणि नंतर लॅपटॉपमध्ये डेटा साठवून ठेवण्यात आला होता.  जेव्हा अमृताने रामकेशला व्हिडिओ आणि फोटो डिलिट करण्यास सांगितले असता, त्याने नकार दिला.  याच कारणावरून तरुणीने म्हणजेच अमृताने राकेशसा जिवंत जाळल्याचे सांगण्यात येत आहे. अमृताने ही हत्या अपघाताप्रमाणे वाटावी यासाठी अनेक गुन्हेगारी मालिक पाहिल्या होत्या, त्यातून तिला काही कल्पना आली आणि तिने युपीएसएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणासोबत नको तेच केलं. 

6 ऑक्टोबर रोजी गांझी विहारच्या चौथ्या मजल्यावर आग लाग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली. सुरुवातीला एसी सिस्टीमचा स्फोट झाल्याचे वृत्त होते आणि आग विझवल्यानंतर पोलिसांनी रामकेशन मीनाटा जळालेा मृतदेह आढळल्याचे प्रकरणातून समोर आले. एकूण तपासात सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आले असता, ज्यात दोघांनी चेहऱ्याला मास्क परिधान केलेले पुरुष दिसत आहेत. त्यानंतर हा स्फोट झाला अशी माहिती समोर आली. 

सीसीटीव्ही स्कॅन केल्यानंतर मोठं बिगं फुटलं 

या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता, रामकेशचे एका तरुणीसोबत लिव्ह इनसंबंध असल्याचे आढळून आले आहे. सीसीटीव्ही स्कॅन केल्यानंतर व्यक्तीची ओळख पटली आणि घटनास्थळाजवळ अमृताच्या फोनचे लोकेशनही सापडले. चौकशीदरम्यान, अमृताने तिचा माजी प्रियकर सुमित आणि सुमितचा मित्र संदीपसोबत हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. सुमित कश्यप हा एलपीडी सिलिंडरचा वितरक म्हणून काम करत होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp