मेन रोडवर बराच वेळ ऑटोरिक्षा उभी असल्याने स्थानिकांना संशय! आत डोकावून पाहिलं तर महिलेचा मृतदेह...

ऑटोरिक्षामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित घटना ही बंगळुरूच्या तिळनगर परिसरातील असल्याची माहिती आहे.

आत डोकावून पाहिलं तर महिलेचा मृतदेह...

आत डोकावून पाहिलं तर महिलेचा मृतदेह...

मुंबई तक

• 12:22 PM • 26 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मेन रोडवर बराच वेळ ऑटोरिक्षा उभी होती; स्थानिकांना वेगळाच संशय

point

आत डोकावून पाहिलं तर महिलेचा मृतदेह...

point

नेमकं प्रकरण काय?

Crime news: ऑटोरिक्षामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित घटना ही बंगळुरूच्या तिळनगर परिसरातील असल्याची माहिती आहे. शनिवारी या परिसरातील ऑटोरिक्षामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली होती. मृत महिलेची ओळख 35 वर्षीय सलमा अशी असल्याची माहिती आहे. पीडिता विधवा असून ती चार मुलांची आई होती. संबंधित महिलेची हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

हे वाचलं का?

बराच वेळ ऑटोरिक्षा उभी होती अन्...

ही घटना शनिवारी संध्याकाळी जवळपास 4 वाजताच्या सुमारास घडली. मेन रोडवर बराच वेळ एक ऑटोरिक्षा उभी असल्याचं पाहून तिथल्या स्थानिकांना संशय आला. त्यांनी त्या रिक्षाच्या आत डोकावून पाहिल्यानंतर त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर, त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तिळकनगर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहचून तपासाला सुरूवात करण्यात आली. तेथील व्हिक्टोरिया रुग्णालयातील मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं.

हे ही वाचा:  मोठी बातमी: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला वेगळंच वळण; आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसांना शरण...

महिलेची हत्या करण्यात आल्याचा संशय 

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित सलमाच्या डोक्यावर वार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. आरोपीने हत्येनंतर मृतदेह एका चादरीत गुंडाळून तो ऑटोरिक्षामध्ये ठेवला आणि घटनास्थळावरून तो फरार झाला. सलमाच्या पतीचे नुकतंच निधन झालं होतं आणि ती तिच्या चार मुलांसह राहत होती, असं सुरुवातीच्या तपासात समोर आलं. घटनेपूर्वी सलमा तिच्या ओळखीच्या व्यक्तीला भेटली होती अशी माहिती मिळाल्याने ही हत्या पीडितेच्या ओळखीच्या व्यक्तीनेच केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

हे ही वाचा: वादातून पत्नी माहेरी निघून गेली, संतापलेल्या वडिलांनी अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींना निर्जस्थळी नेलं अन्... बुलढाण्यात खळबळ

पोलिसांनी दिली माहिती 

पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पीडितेची हत्या दुसऱ्या ठिकाणी झाली असून आणि नंतर मृतदेह त्या ऑटोमध्ये ठेवण्यात आला. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून ज्यात रक्ताचे डाग आणि कपड्यांचे नमुने यांचा समावेश आहे. तिळकनगर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या अटकेसाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनिसार, या घटनेसंदर्भात महत्त्वाचा पुरावा हाती लागला असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. 

    follow whatsapp