Crime News : छत्तीसगढच्या रायपूर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या मुलीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला आहे. यामध्ये ती नवऱ्यावर आणि सासरच्या इतर काही लोकांनी त्रास दिल्याचा आरोप करत आहे. मनीषा गोस्वामी असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तिने नवरा आशुतोष गोस्वामी,दीर आणि सासू-सासरे सतत त्रास देत होते, असं आत्महत्या करण्यापूर्वी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
जानेवारीत विवाह झाला होता
मीडिया रिपोर्ट्नुसार, मनीषाचा 10 महिन्यांपूर्वीच म्हणजेच जानेवारी महिन्यात आशुतोष गोस्वामी याच्यासोबत विवाह झाला होता. तिने सांगितले की, या वर्षी जानेवारीत लग्नानंतरपासून तिला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे त्रास दिला जात होता. "मी माझ्या भावंडांमध्ये सर्वात मोठी आहे आणि घर चालवणारे फक्त माझे वडील आहेत. मी माझ्या सासऱ्याच्या आणि कुटुंबीयांच्या वागण्यामुळे खूप त्रासली आहे.",असंही तिने स्पष्ट केलं होतं.
हुंड्यासाठी सासरच्यांकडून छळ
व्हिडिओत मनीषाने सांगितले की तिच्याकडे "कोणताही मार्ग उरलेला नाही,जीवनातून कंटळाली आहे. माझी कोणतीही चूक नसताना मला दोन वेळेस मारहाण करण्यात आली. माझ्या सासूने मला साथ दिली. मात्र, सासरच्या कुटुंबियांनी हुंडा आणि इतर काही कारणांमुळे खूप छळ केला. दहा महिन्यांच्या संसारात मी 10 दिवसही सुखी नव्हते. मला लग्न झाल्यानंतर माझे 10 दिवसही आनंदात गेले नाहीत.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मनीषाचे वडील न्याय आणि निष्पक्ष तपासणीची मागणी करत डीडी नगर पोलीस ठाण्यात पोहोचले होते. प्रकरण नोंदवण्यात आले असून, पोलीस व्हिडिओत केलेल्या आरोपांची तपासणी सुरू केली आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे, आणि कुटुंबीय व शेजाऱ्यांचे निवेदन नोंदवले जात आहेत. तपासकर्ते महिलाच्या मृत्यूस कारणीभूत घटनांचा शोध घेण्यासाठी तिच्या मोबाइल फोन आणि इतर डिजिटल पुराव्यांचीही तपासणी करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











