बायकोचे परपुरुषाशी सुरू होते शरीरसंबंध; पतीने रंगेहाथ पकडलं तेव्हा काहीच नाही केलं, पण...

Immoral Relationship: पत्नीचे ज्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते त्याच व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह हायवेवर फेकल्याची धक्कादायक घटना जयपूरमध्ये घडली आहे.

husband got angry after seeing his wife having an immoral sexual relationship with her lover plotted to murder her lover

(प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: ग्रोक)

मुंबई तक

• 06:06 PM • 25 Oct 2025

follow google news

जयपूर: जयपूरमधील एका हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. येथे, पत्नीच्या अनैतिक संबंधाने तिच्याच प्रियकराचा जीव गेला आहे. या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या आरोपी पतीला अटक केली आहे. ही घटना जयपूरच्या ग्रामीण भागात घडली. नेमकं या प्रकरणात काय घडलं ते आपण सविस्तर जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हत्या नेमकी कशी घडली?

जयपूरचा रहिवाशी असलेला प्रीतम याच्या पत्नीचे रामनिवास नावाच्या तरुणासोबत बऱ्याच दिवसांपासून अनैतिक शारीरिक संबंध होते. एके दिवशी ही गोष्ट प्रीतमला समजली. ही गोष्ट समजताच प्रीतमने रागाच्या भरात रामनिवास याला कायमचं संपवायचं असा निर्णय घेतला. दरम्यान, 13 ऑक्टोबर 2025 रोजी जयपूर ग्रामीणमधील बहलोदजवळ रामनिवासचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आला. त्यामुळे त्याच दिवशी रामनिवासच्या भावाने रायसर पोलीस ठाण्यात या हत्येप्रकरणी तक्रार दाखल केली.

हे ही वाचा>> पोलीस आत शिरले अन् त्यांना 5 तरूण आणि 6 मुली 'नको ते' करताना त्याच अवस्थेत सापडले, कशी मिळालेली टिप?

24 तासात सापडला आरोपी 

रामनिवासच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी जलदगतीने कारवाई केली आणि अवघ्या 24 तासांत प्रीतम उर्फ पितांबर याला अटक केली. चौकशीदरम्यान, प्रीतमने त्याच्या पत्नीचा प्रियकर असलेल्या रामनिवास याची हत्या केल्याची कबुली दिली. मित्रांच्या मदतीने रामनिवासची हत्या केल्याचे यावेळी त्याने सांगितले. प्रीतमने पुढे पोलिसांना असेही सांगितले की, त्याने रामनिवासला त्याच्या पत्नीसह रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे रागाच्या भरात त्याने रामनिवासच्या हत्येचा कट रचला होता.

हे ही वाचा>> पत्नीला इंस्टाग्रामवर रील बनवायचा नाद... पती संतापला अन् किरकोळ वादातून घडली भयानक घटना

खुनाचा कट कसा रचला?

प्रीतमने त्याच्या मित्रांसह रामनिवासवर हल्ला केला. रामनिवास एकटा असताना, प्रीतम आणि त्याच्या साथीदारांनी त्याला मरेपर्यंत मारहाण केली. त्यानंतर मृतदेह मनोहरपूर-दौसा महामार्गाच्या बाजूला फेकून दिला. आता पोलिसांनी हत्येप्रकरणी प्रीतम आणि त्याच्या मित्रांना अटक केली आहे.

पोलिसांची त्वरित कारवाई

या प्रकरणात जयपूर पोलिसांनी जलदगतीने कारवाई केली. चौकशीदरम्यान प्रीतमने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे नेमकी हत्या का आणि कशासाठी करण्याता आली याचा पोलिसांना उलगडा झाला आहे. ज्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेत कोर्टात हजर केलं. सर्व आरोपींना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

    follow whatsapp