Australian women cricketers molestation : मध्य प्रदेशातील इंदूर शहरात ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाच्या दोन खेळाडूंसोबत घडलेल्या घटनेमुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. आगामी सामन्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असतानाच, दुचाकीस्वाराने दोन ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी युवकाला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
इंदूरमध्ये घडला प्रकार
ही घटना इंदूरच्या रॅडिसन ब्लू हॉटेलजवळ घडली. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन संघातील दोन खेळाडू हॉटेलमधून जवळच्या एका कॅफेकडे जात असताना एका दुचाकीस्वाराने त्यांचा पाठलाग करत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही खेळाडूंनी तात्काळ त्यांच्या सुरक्षा टीमला SOS नोटिफिकेशन पाठवले. माहिती मिळताच सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा : अमरावती हादरली, कृषी विभागातील लिपिकाची प्रेम प्रकरणातून हत्या, विवाहित महिलेसोबत होते अनैतिक संबंध
या प्रकरणाची तक्रार ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांनी एमआयजी पोलिस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी युवक अकील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी काही तासांच्या आत त्याला अटक करून चौकशीला सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.
खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या प्रकारामुळे ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. इंदूरमध्ये 25 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वीच हा प्रकार घडल्याने खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. होळकर स्टेडियमवर हा सामना होणार असून, दोन्ही संघांनी आधीच सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे हा सामना गटातील अव्वल स्थानासाठी निर्णायक ठरणार आहे. या घटनेनंतर शहरातील पोलीस आणि क्रीडा प्राधिकरणांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. विदेशी खेळाडू, विशेषतः महिला खेळाडू, यांच्यासाठी सुरक्षा अधिक मजबूत करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. स्टेडियम परिसर, हॉटेल्स आणि खेळाडूंच्या हालचालींच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियाचा संघ ताहलिया मॅकग्राच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. या संघात फोएबे लिचफील्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, एश्ले गार्डनर यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ लौरा वोलवॉर्डच्या नेतृत्वाखाली उतरणार आहे, ज्यात मारिजाने कॅप, क्लो ट्रायोन आणि नादिन डिक्लर्क यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
"10 महिन्यांच्या संसारात 10 दिवसही सुखी नव्हते", सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या
ADVERTISEMENT











