वादातून पत्नी माहेरी निघून गेली, संतापलेल्या वडिलांनी अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींना निर्जस्थळी नेलं अन्... बुलढाण्यात खळबळ

मुंबई तक

बुलढाण्यातील अंढेरा गावात वडिलांनीच आपल्या अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींची गावातील निर्जनस्थळी हत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

वडिलांनी अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींना निर्जस्थळी नेलं अन्...
वडिलांनी अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींना निर्जस्थळी नेलं अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संतापलेल्या वडिलांनी अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींना निर्जस्थळी नेलं अन्...

point

पत्नी माहेरी निघून गेल्याने वडिलांचं रागाच्या भरात भयानक कृत्य

point

बुलढाण्यातील धक्कादायक घटना

Crime News: बुलढाण्यात एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील गावात जुळ्या मुलींची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. वडिलांनीच आपल्या अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींची गावातील निर्जनस्थळी हत्या केल्याची माहिती आहे. 

वाटेत पती-पत्नीमध्ये मोठा वाद... 

प्रकरणातील आरोपीचं नाव राहुल चव्हाण असून तो 21 ऑक्टोबर रोजी त्याच्या पत्नी आणि दोन मुलींसह बाईकवरून वाशिम जिल्ह्यातील मनोरा तहसीलच्या रुईगोस्ता गावी जात होता. वाटेत दोघे पती पत्नीमध्ये मोठा वाद झाला. वाद वाढत गेला पत्नी गाडीवरून खाली उतरली, त्यानंतर ती तिच्या पतीला आपल्या आईवडिलांच्या घरी जात असल्याचं सांगून रस्त्यावरून पायी निघून गेली.

निर्जन जंगलात मुलींची हत्या 

आरोपी राहुल सुद्धा त्याच्या दोन जुळ्या मुलींना सोबत घेऊन पुढे निघाला. परंतु, अंढेरा गावाजवळ त्याने अचानक त्याची गाडी थांबवली आणि आपल्या मुलींना तो जंगलात घेऊन गेला. नंतर, त्याने त्या निर्जन जंगलात त्याच्या मुलींचा गळा चिरून त्यांची निर्दयीपणे हत्या केली. हत्येनंतर, तो आपल्या गावात रुईगोस्ता येथे पोहोचला. 

हे ही वाचा: Personal Finance: वरकमाई, Saving नाही.. तरी 30 हजार पगारात जमवा लाखो रुपये!

पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्ह्याची कबूली 

शनिवारी (25 ऑक्टोबर) आरोपी राहुल चव्हाण वाशिम जिल्ह्यातील आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्यावेळी त्याने पोलिसांसमोर आपल्या दोन जुळ्या मुलींची हत्या केल्याचं कबूल केलं. आसेगाव पोलिसांनी लगेच त्याला अटक केली आणि नंतर, त्याला अंढेरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp