Personal Finance: वरकमाई, Saving नाही.. तरी 30 हजार पगारात जमवा लाखो रुपये!

रोहित गोळे

Investment Tips: 30 हजार रुपयांच्या पगारासह बजेटिंग पद्धत अवलंबली तर तुम्हाला देखील लाखो रुपयांचा निधी सहजपणे उभारता येईल. गुंतवणूक कशी संतुलित करावी आणि 2 लाख रुपयांपेक्षा जास्त फंड कसा उभारता येईल हे आपण पाहूया.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Personal Finance Investment Tips: कमी पगार असल्याने अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तसेच त्यांना त्यांची स्वप्नेही पूर्ण करायची असता. परंतु महिन्याला 30 हजार रुपये कमवणारे देखील हळूहळू श्रीमंत होऊ शकता. कोणतेही अतिरिक्त उत्पन्न किंवा सेव्हिंग्स नसतानाही, तुम्ही सहजपणे एक मोठा फंड उभारू शकता.

राजेश नावाच्या मुलाने त्याचे वीकेंड डिनर आणि आउटिंग सोडले नाही. पण 30 हजार रुपये मासिक पगार असतानाही तो हळूहळू श्रीमंत झाला. हे नेमकं कसं घडलं याबाबत सविस्तर जाणून घ्या.

'या' फॉर्म्युल्याचा करा वापर

राजेश एक सामान्य नोकरदार आहे, परंतु त्याने 50-25-25 बजेटिंग पद्धत स्वीकारली आहे, जी जुन्या 50-20-30 फॉर्म्युल्याचीच एक सोपी आवृत्ती आहे. ही पद्धत जीवनाला कठोर नियमांमध्ये बांधत नाही, तर त्याऐवजी आनंद आणि नियोजन संतुलित करते. राजेशचा पगार दरमहा 30 हजार रुपये आहे. 

आता फॉर्म्युल्यातील सगळ्यात आधी 50 टक्के म्हणजे 15 हजार रुपये आवश्यक गोष्टींवर तो खर्च करतो. यामध्ये भाडे 7 हजार, किराणा सामान 3500 रुपये, वीज, पाणी आणि इतर गोष्टी २ हजार, प्रवास खर्च 1500 रुपये आणि कपडे आणि इतर मूलभूत वस्तू 1 हजार रुपये यांचा समावेश आहे. राजेश त्याचे सर्व खर्च काळजीपूर्वक व्यवस्थापित करतो जेणेकरून गुंतवणूक करण्यात कोणतीही अडचण येऊ नये.

हे वाचलं का?

    follow whatsapp