Crime Story : मुलं आपल्या बापाला देवासमान मानतात. मात्र, तोच बाप जर मुलांच्या जीवावर उठत असेल तर? असाच देव समजला जाणारा बाप एका प्रकरणात आपल्या मुलांसाठी मृत्यूचं तांडव घेऊन आला होता. त्याला पाहिलं तर तो मुलांवर प्रेम करणारा बाप वाटायचा. मात्र, तो आतून इतका क्रूर होता की त्याने स्वत:च्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता. पोटच्या 9 मुलांना त्याने गोळ्या घालून संपवलं होतं. जवळपास वीस वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियाच्या फ्रेस्नो शहरात एका रुममध्ये मृतदेह आढळले होते. हा क्रूरकर्मा नेमका कोण होता? जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
मार्कस वेसनचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला होता. त्याने सैन्यात देखील काम केलं होतं. 1960 मध्ये त्याने वेसन सोलोरियो नावाच्या विधवा महिलेशी विवाह केला होता. रोजमेरीचे पूर्वीच्या पतीकडून 8 मुलं होते. वेसन त्यांच्यासोबत राहू लागला. हळहूळ तो त्यांच्यावर वर्चस्व मिळवू लागला. 1971 मध्ये रोजमेरीने वेनसच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. मात्र, त्याचा क्रूरपणा तेव्हा सुरु झाला, जेव्हा त्याने 1974 मध्ये त्याच्या आठ वर्षांच्या एलिझाबेद या मुलीवर बलात्कार केला होता. एलिझाबेद केवळ 14 वर्षांची होती, जेव्हा तिने 34 वर्षीय वेसनसोबत लग्न केलं होतं. चार महिन्यांनंतर एलिझाबेदने पहिल्या अपत्याला जन्म दिला. या दाम्पत्याने एकूण 10 मुलांना जन्म दिला. त्यातील एका मुलाचा जन्मताच मृत्यू झाला होता.
स्वतःला देव असल्याचं घोषित केलं
वेसनच्या क्रौर्याची मालिका इथंच थांबली नाही. एलिझाबेथच्या धाकट्या बहिणीनेही आपल्या सात मुलांना वेसनच्या हवाली केलं, कारण ती अमली पदार्थांच्या आहारी गेली होती. वेसनने आयुष्यात कधीही नोकरी केली नाही. तो सरकारी वेलफेअर पेन्शनवर जगत होता आणि मुलांकडून पैसे उकळत होता. पण खरी अत्याचाराची स्टोरी घराच्या चार भिंतींच्या आत सुरू होती. वेसनने एलिझाबेथला मुलांच्या संगोपनात काहीच अधिकार दिले नाहीत. सर्व मुलांना घरातच शिक्षण दिलं जात होतं, जिथे तो येशू ख्रिस्तांना ‘व्हॅम्पायर’ (रक्तपिपासू) म्हणायचा आणि स्वतःला ‘देव’ घोषित करायचा. मुलांना त्याला ‘मास्टर’ किंवा ‘लॉर्ड’ म्हणायला भाग पाडलं जात होतं.
भाऊ-बहिणींना एकमेकांशी बोलण्याची परवानगी नव्हती
इतकंच नव्हे तर भाऊ-बहिणींना एकमेकांशी बोलण्यास मनाई होती. वेसनने महिलांना आणि मुलींना आपल्या ‘भविष्यातील पत्नी’ म्हणून तयार केलं होतं. आठव्या वर्षापासूनच त्यांना लैंगिक कृती शिकवल्या जात होत्या. वेसनने आपल्या दोन मुली आणि तीन भाचींवर बलात्कार करून त्यांच्याकडून मूलं जन्माला घातली. या सर्व मुलांना त्यांच्या आईशी बोलण्याचीही मनाई होती.
स्वतःच्या 9 मुलांचा घेतला जीव
मग आला 2004 चा काळा दिवस. वेसनने सांगितलं की संपूर्ण कुटुंब फ्रेझ्नो सोडून वॉशिंग्टनला जाणार आहे, जिथे त्याचे आई-वडील राहत होते. पण घरातून पळून गेलेल्या दोन भाचींनी इतर कुटुंबीयांबरोबर मिळून घरातल्या मुलांना सोडवण्याचा निर्णय घेतला. पोलिस वेसनच्या घरी पोहोचले तेव्हा त्याने पोलिसांना दारातच थांबवलं आणि स्वतः घरात गेला. काही वेळाने तो बाहेर आला तेव्हा त्याचे कपडे रक्ताने माखलेले होते. पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा एका खोलीत नऊ मृतदेह पडलेले होते. प्रत्येकाच्या डोळ्यांवर गोळी झाडण्यात आली होती. हे सर्व वेसनचीच मुलं होती. वेसनला ताब्यात घेण्यात आलं आणि 2005 मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र 2019 मध्ये कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गॅविन न्यूसम यांनी फाशीची शिक्षा रद्द करून वेसनची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली.
आजही भोगतोय शिक्षा
त्या घटनेचं भयावह दृश्य आजही फ्रेझ्नोचे महापौर जेरी डायर यांच्या डोळ्यांसमोर आहे, जे त्या वेळी पोलीस प्रमुख होते. त्यांनी सांगितलं की — “हे शहराच्या इतिहासातील सर्वात भीषण हत्या प्रकरण होतं.” आजही मार्कस वेसन सॅन क्वेंटिन तुरुंगात आपली शिक्षा भोगत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











