महिलेचा शारिरीक छळ, साताऱ्यातील विवाहितेनं घेतला गळफास, शवविच्छेदनाच्या अहवालाबाबत आईचा धक्कादायक दावा

मुंबई तक

satara Crime : साताऱ्यातील महिला डॉक्टराच्या आत्महत्येनंतर आता याच सातारा जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाठार निंबाळकर येथे एका आत्महत्या केलेल्या महिलेचा शवविच्छेदनाचा अहवालच बदलण्यात आल्याचा आरोप महिलेच्या आई-वडिलांनी केला आहे.

ADVERTISEMENT

Satara Crime
Satara Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सातारा जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार

point

आत्महत्या केलेल्या महिलेचा

Satara Crime : साताऱ्यातील महिला डॉक्टराच्या आत्महत्येनंतर आता याच सातारा जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाठार निंबाळकर येथे एका आत्महत्या केलेल्या महिलेचा शवविच्छेदनाचा अहवालच बदलण्यात आल्याचा आरोप महिलेच्या आई-वडिलांनी केला आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव दिपाली असे होते. दिपालीची आई भाग्यश्री यांनी मुलीच्या मृत्यू प्रकरणात शवविच्छेदन अहवाल तयार करण्यासाठी संबंधित महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. या आरोपामुळे आता सातारा जिल्ह्यात खळबळ माजली आहे. 

हे ही वाचा : आधी जीवापाड प्रेम, नंतर विश्वासघात, 'त्या' कारणावरून गर्लफ्रेंडने तरुणावर ओतलं तेल, UPSC च्या विद्यार्थ्याला संपवलं

सातारा महिला डॉक्टर आत्महत्येनंतर आणखी एक घटना...

दरम्यान, आत्महत्या केलेली महिला ही विवाहित होती. तिचं 2021 मध्ये अजिंक्य निंबाळकर या लष्करी अधिकाऱ्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर सासरच्या मंडळींकडून दिपालीला मानसिक आणि शारिरीक छळ करण्यात आल्याचं समोर आलं आहे. अखेर 19 ऑगस्ट रोजी दिपालीनं गळफास घेत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याच प्रकरणात आता महिलेची आई दिपाली यांनी पोलिसांकडे सखोल माहिती मिळवावी अशी मागणी केली आहे. 

पोलिसांनी पाच दिवस शवविच्छेदन अहवाल दिला नव्हता

अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडवकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पाच दिवस शवविच्छेदन अहवाल दिला नव्हता, संबंधित अहवालावर सही करणाऱ्या महिला डॉक्टरांवर खोटा अहवाल तयार करण्यास दबाव आणला होता, असे भाग्यश्री यांनी सांगितलं. यामुळे आणखी संशय बळावला गेला. 

हे ही वाचा : वडिलांकडून लेकीवर पाच महिने लैंगिक शोषण, लेकाचा थेट बापावर गोळीबार करत कुऱ्हाडीने हल्ला

या घटनेनंतर भाग्यश्री पाचांगणे यांनी सांगितलं की, माझ्या मुलीच्या हत्येप्रकरणात राजकीय दबाव आणण्यात आला होता. पोलिसांच्या संगनमताने सत्य दडपवण्यात आले. डॉक्टरांवर चुकीचा शवविच्छेदनाचा अहवाल तयार करण्यासाठी दबाव आणण्यात आला होता, सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं कारण नमूद करण्यात आलं. या प्रकरणात आता पोलिसांची भूमिका कशी असेल हे बघणं गरजेचे आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp