Crime News : मुलीचं आणि वडिलांच्या नात्यासारखं नातं या जगात कुठेच शोधून सापडणार नाही. पण, एका नराधम बापानेच आपल्या लेकीवर तब्बल पाच महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आहे. या बापाच्या कृत्याने मुलीच्या आणि वडिलांच्या नात्याला काळिमा फासली गेली आहे. वडिलांच्या अशा कृत्याने मुलीनं आपल्या मावशीचं घर गाठलं आणि आपबीती सांगितली. दरम्यान, ही घटना राजस्थान राज्यातील डीग जिल्ह्यातील आहे. या घटनेनं एकच हळहळ व्यक्त केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : रेल्वेखाली येऊन तरुणाने केली आत्महत्या, मुंबईतील जोगेश्वरी रेल्वेस्थानकावरील घटना, कुटुंबीय म्हणाले...
या प्रकरणावर मुलींनी उघडपणे बोलल्यानंतर वाद
पीडितेच्या मावशीने या घटनेबाबत कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली. त्यानंतर मुलीला अनेकदा फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपी वडिलांना संबंधित प्रकरणाचा खुलासा झाल्याचे समजताच तो रविवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास कोसिकन गावात पोहोचला. त्यानंतर दोन्ही मुली या प्रकरणावर मुलींनी उघडपणे बोलल्यानंतर मोठा वाद उफळला.
आधी गोळीबार नंतर वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला अन् दी एंड
अशा स्थितीत रागावलेल्या मद्यधुंत अवस्थेतील वडिलांनी पिस्तूल बाहेर काढले आणि आपल्या मुलींना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मुलींच्या भावाने आणि पुतण्याने, त्यांच्याकडून पिस्तूल घेत आपल्या वडिलांवर गोळीबार केला, त्यानंतर नराधम वडील हे जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांनी कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं.
या एकूणच घटनेची माहिती मिळताच, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शववितच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी मुलगा आणि पुतण्याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान, दोन्ही मुलींनी सांगितलं की, त्याचे वडील बराच काळ दारूच्या नशेत त्यांच्यावर बलात्कार करत होते आणि त्यांना गप्प राहण्याची धमकी देत आहेत.
हे ही वाचा : दिल्ली हादरली! तरुणी विद्यापीठात जात होती, ओळखीच्याच तरुणाने थेट तिच्यावर अॅसिड फेकलं, नंतर तरुणीचा...
कोसिकल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या जबाबावरून बलात्कार करण्यात आला आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या एकूण प्राथमिक तपासातून दिसून आले की, आरोपी वडिलांनी मुलींना त्यांचे गुपित उघड केल्यानंतर रागाच्याभरात त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूल आणि कुऱ्हाड जप्त केली आहे.
ADVERTISEMENT











