वाद पेटला, डोक्यात टिकाव घातला, 60 वर्षाच्या संजय यांना जागीच संपवलं! CCTV फुुटेज पाहून अकोला हादरला

मुंबई तक

03 Jun 2025 (अपडेटेड: 03 Jun 2025, 10:22 AM)

संजय कौशल नावाच्या 60 वर्षीय रिटायर्ड इंजिनिअरची हत्या करण्यात आली. जमीन खणण्यासाठी वापरला जाणऱ्या टिकावने वार करून क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अकोल्यातील हत्येचा धडकी भरवणारा CCTV व्हिडीओ

point

एकाच टॉवरमध्ये राहणाऱ्या दोघांचा झाला होता वाद

point

जामिनावर सुटलेल्या आरोपीनं संजय कौशल यांना संपवलं

Akola News : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये हादरवून सोडणाऱ्या घटना घडल्या आहेत. अशातच आता अकोल्यातील रणपिसे नगरमध्ये थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मुरलीधर टॉवरजवळ सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> भरधाव हायवा ट्रक आला आणि फुटपाथवरच्या वाहनांना चिरडत निघाला, चंद्रपुरात पुण्यासारखीच घटना...

संजय कौशल नावाच्या 60 वर्षीय रिटायर्ड इंजिनिअरची हत्या करण्यात आली. जमीन खणण्यासाठी वापरला जाणऱ्या टिकावने वार करून क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा थरकाप उडवणारा व्हिडीओ जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी महेंद्र विश्वासराव पवार याला ताब्यात घेतले आहे.

पोलीस उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी याबद्दल माहिती दिली. पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. सिव्हिल लाइन्सचे ठाणे प्रभारी जयवंत सातव यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दोन विशेष पोलिस पथकांनी आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवले.

हे ही वाचा >> अल्पवयीन मुलगी बॉयफ्रेंडसोबत हॉटेलच्या रुममध्ये गेली, आतून आला जोरदार आवाज अन्...

सुत्रांनुसार, आरोपी महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. नुकताच तो न्यायालयातून जमानतीवर सुटला होता. विशेष बाब म्हणजे, मृतक संजय कौशल आणि आरोपी पवार हे दोघेही मुरलीधर टॉवरमध्येच राहत होते.

हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत असून, या खळबळजनक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरलं आहे. या घटनेनं गुन्हेगारांना कायद्याचा धाक आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय.