हैद्राबाद गॅझेटियरमुळे ओबीसी आरक्षण संपल्यात जमा, WhatsApp स्टेटस ठेवत अकोल्यातील तरुणाची आत्महत्या

Akola Crime : हैद्राबाद गॅझेटियरमुळे ओबीसी संपल्यात जमा, WhatsApp स्टेटस ठेवत अकोल्यातील ओबीसी तरुणाची आत्महत्या

Mumbai Tak

मुंबई तक

09 Oct 2025 (अपडेटेड: 09 Oct 2025, 11:47 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

हैद्राबाद गॅझेटियरमुळे ओबीसी संपल्यात जमा, तरुणाने WhatsApp स्टेटस ठेवल

point

ओबीसींवर अन्याय होत असल्याच्या भावनेतून तरुणाने आयुष्य संपवलं

Akola Crime : अकोल्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हैद्राबाद गॅझेटियर लागू केल्यामुळे ओबीसी आरक्षण संपल्यात जमा आहे, असं WhatsApp स्टेटस ठेवत अकोल्यातील तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विजय बोचरे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून ते ओबीसी कार्यकर्ते म्हणून चळवळीत काम करत होते. 

हे वाचलं का?

ओबीसी आरक्षणाबाबत सरकारची धरसोडीची भूमिका, कुटुंबियांचा आरोप 

अधिकची माहिती अशी की, ओबीसी कार्यकर्ते विजय बोचरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. पातुर तालुक्यातील आलेगावातील बसस्थानकाच्या शेडमध्ये गळफास घेत त्यांनी पहाटेच्या सुमारास आत्महत्या केलीय. आत्महत्येपूर्वी मुख्यमंत्र्यांचे नावे लिहिलेलं पत्र त्यांनी व्हाट्सअप स्टेटसला ठेवलंय. बोचरे हे समता परिषद आणि वंचित बहुजन आघाडीत सक्रियपणे काम करत होते. बोचरे यांनी सरकारनं ओबीसी आरक्षणाच्या  मुद्द्यावर घेतलेल्या धरसोडीच्या भूमिकेमूळेच आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबिय आणि ओबीसी संघटनांनी केलाय. दरम्यान, या घटनेनंतर गावात मोठी गर्दी झालीये. जिल्हाभरातून ओबीसी नेते, कार्यकर्ते आलोगावात जमायला सुरूवात झालीये. मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी घटनास्थळाला भेट दिलीये. सरकारच्या ठोस आश्वासनाशिवाय मृतदेह जाग्यावरून उचलणार नसल्याचं कुटूंबिय आणि गावकरी म्हणालेय. 

हेही वाचा : मुंबई : उंच इमारतीवरुन वीट कोसळली अन् कामावर निघालेल्या तरुणीच्या डोक्यावर पडली, रुग्णालयता नेताच...

स्टेट्सला ठेवलेल्या पत्रात नेमकं काय लिहिलं होतं?

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात हैद्राबाद गॅझेटियरनुसार काढलेला अध्यादेश मूळ ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारा असल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आलाय.‌ त्यामुळे मूळ ओबीसींचे आरक्षण संपल्यात जमा असल्याची खंत व्यक्त केली. सरकारने ओबीसींना वाऱ्यावर सोडलं असून त्यांना मूळ प्रवाहात न येऊ द्यायचं‌ सरकारी धोरण असल्याचा आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. ओबीसींच्या मुलाबाळांचे भविष्य सुरक्षित नसल्याने आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचं पत्रात नमूद केलंय. सरकारकडे जातीय जनगणना करण्याची मागणी देखील आत्महत्या केलेल्या तरुणाने व्हाट्सअॅप स्टेटसवर ठेवलेल्या पत्रात केली होती. 

पोलीस याबाबत बोलताना म्हणाले, आलेगावात विजय बोचरे म्हणून एक 58 वर्षीय गृहस्थ आहेत. त्यांनी बसस्टँडजवळ रात्री उशीरा आत्महत्या केली आहे. त्यांच्याकडे आपल्याला काही चिठ्ठ्या सापडल्या आहेत. मराठा आंदोलन झाल्यानंतर हैद्राबाद गॅझेट लागू झालं. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर प्रॉबलेम येत आहे, या भावनेतून त्यांनी आत्महत्या करतोय, असा त्यांच्या चिठ्ठ्यामध्ये उल्लेख आहे. नेमकं कारण तेच आहे? की आणखी काय? याबाबत आमचा तपास सुरु आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

सचिन घायवळ शस्त्रपरवाना प्रकरण तापलं, मंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी; सुषमा अंधारे आक्रमक

    follow whatsapp