बंगळुरू : शहरातील एका खाजगी विद्यापीठातील 45 वर्षीय प्राध्यापकाला 19 वर्षीय विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गेल्या महिन्यात घडली असून विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं. मात्र, चौकशीनंतर आरोपी प्राध्यापकाला जामीनावर सोडण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
घरी बोलावून प्राध्यापकाचा विद्यार्थीनीवर अत्याचार
पोलिसात देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, 25 सप्टेंबर रोजी प्राध्यापकाने विद्यार्थिनीला दुपारच्या जेवणासाठी आपल्या घरी बोलावलं होतं. सुरुवातीला तिने नकार दिला. मात्र प्राध्यापकाने वारंवार आग्रह धरत तिच्या आईलाही आश्वासन दिलं की, त्याची पत्नी व मुले घरी असतील आणि मुलगी सुरक्षित राहील, त्यामुळे ती अखेर तयार झाली. मात्र, नंतर या प्राध्यापकाने तिच्यासोबत गैरकृत्य केलंय.
हेही वाचा : जामखेडमधील कलाकेंद्रावर टोळक्याचा हल्ला, विनयभंग करत खंडणीची मागणी; चौघांवर गुन्हा दाखल
बॉयफ्रेंडशी ब्रेकअप कर, प्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे मागणी
विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितलं की, हा प्राध्यापक याआधीही तिच्या पालकांशी संपर्क साधून तिच्या उपस्थितीबाबत असंतोष व्यक्त करत असे. तो तिच्या असाइनमेंट्स आणि कॉलेजशी संबंधित अडचणी सोडवण्याच्या बहाण्याने जवळीक साधत होता. त्याने विद्यार्थिनीच्या पालकांना सांगितलं होतं की, ती त्याच्या फ्लॅटजवळील पीजीमध्ये राहिली तर तो रोज मदत करू शकेल. मात्र, जेव्हा ती त्याच्यासोबत दुचाकीवरून अपार्टमेंटमध्ये पोहोचली तेव्हा प्राध्यापकाने सांगितले की पत्नी आणि मुले शहराबाहेर आहेत. घरात पोहोचल्यावर त्याने तिच्याशी गैरवर्तन सुरू केलं. त्याने वैयक्तिक प्रश्न विचारत तिच्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करण्यास सांगितलं आणि गुण व उपस्थिती वाढवण्याचे आश्वासन दिलं. विरोध करूनही त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
विद्यार्थिनीने एका मित्राच्या फोनचा बहाणा करून तिथून निघून गेली आणि नंतर धैर्य एकवटून तिने तिलकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 75 (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा आणि शिक्षकांच्या जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
