अबब..! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या जळगावातील घरात 1.5 कोटींची रोकड, अर्धा किलो सोने...मोठं घबाड

मुंबई तक

03 Jul 2026 (अपडेटेड: 03 Jul 2026, 12:43 PM)

akola stamp deputy collector kiran chaudhari Jalgaon house acb raid : अकोल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावातील घरावर एसीबीची 10 तास झडती; दीड कोटींहून अधिक रोकड, अर्धा किलो सोने आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त.

akola stamp deputy collector

akola stamp deputy collector

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अबब..! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या जळगावातील घरात 1.5 कोटींची रोकड,

point

अर्धा किलो सोने...मोठं घबाड, लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

akola stamp deputy collector kiran chaudhari Jalgaon house acb raid : अकोल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगाव येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या झडतीत तब्बल 1 कोटी 53 लाख 630 रुपयांची रोकड, अर्धा किलो सोने आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अकोल्यातील कारवाईनंतर किरण चौधरी यांचे जळगाव येथील घर सीलबंद करण्यात आले होते. त्यानंतर या घरात एसीबीच्या पथकाने झडती घेतली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर रोकड, सोने आणि कागदपत्रे हाती लागल्याने या प्रकरणाची चर्चा अधिकच वाढली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Bishnoi Gang कडून आमदाराला धमक्या, पटोले अन् वडेट्टीवारांनी विधानसभेत आवाज चढवला

10 तास झडतीची कारवाई, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात

जळगाव येथील या निवासस्थानी दुपारी 4 वाजल्यापासून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत जवळपास 10 तास झडतीची कारवाई सुरू होती. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घरातील प्रत्येक भागाची तपासणी करत रोकड, अर्धा किलो सोने तसेच महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. या संपूर्ण कारवाईदरम्यान पंच उपस्थित होते. झडतीदरम्यान मिळालेल्या मुद्देमालाची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपासासाठी तो ताब्यात घेण्यात आला आहे.

हेही वाचा : 'गुन्हे धुण्याचे वॉशिंग मशीन, राज्यात काय सुरु आहे?', पक्षांतरावरुन हायकोर्टाचे संतप्त सवाल

दोन तरुणांना पोलिसांकडून रंगेहात अटक

दरम्यान, याच सीलबंद घरात घुसलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी रंगेहात अटक केली होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हे दोघेही किरण चौधरी यांचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. ते नेमके कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या उद्देशाने सीलबंद घरात गेले होते, याचाही तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

एसीबीच्या या कारवाईदरम्यान परिसरात कडेकोट सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. झडतीची प्रक्रिया शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती. जवळपास 10 तास चाललेल्या या कारवाईनंतर एक कोटी 53 लाख 630 रुपयांची रोकड, अर्धा किलो सोने आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.