सिया अन् चेतनने सगळा प्लॅन 'त्या' व्यक्तीला सांगितलेला, केतनच्या हत्याप्रकरणात नवे नाव समोर

मुंबई तक

03 Jul 2026 (अपडेटेड: 03 Jul 2026, 11:54 AM)

ketan Agarwal murder case : केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात आणखी एका तरुणाचे नाव समोर आले आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी कथित कटाची माहिती त्यालाही दिल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे.

ketan Agarwal murder case

ketan Agarwal murder case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सिया अन् चेतनने सगळा प्लॅन 'त्या' व्यक्तीला सांगितला

point

केतनच्या हत्याप्रकरणात नवा अँगल समोर

ketan Agarwal murder case : केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात आता एक नवा अँगल समोर आला आहे. या प्रकरणात आणखी एका तरुणाचे नाव तपासादरम्यान पुढे आले असून तो मुख्य आरोपी चेतन चौधरीचा वर्गमित्र असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी केतन अग्रवालच्या हत्येचा कथित कट या तरुणालाही सांगितला होता. तसेच 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर होणाऱ्या ट्रेकला सोबत येण्याची विनंतीही त्याच्याकडे करण्यात आली होती. मात्र त्याने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याचे तपासातून समोर आले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : काँग्रेसमधील मरगळ ते सरकारच्या दाव्यांची चिरफाड, सतेज पाटलांची सडेतोड मुलाखत

चेतन चौधरीशी 'त्याचा' नियमित संपर्क

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब उघड झाली आहे. केतन अग्रवालची कथित हत्या झाल्यानंतर चेतन चौधरी सर्वप्रथम याच मित्राला भेटल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सिया गोयलनेही घटनेनंतर त्याच्याशी संवाद साधल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित तरुण हा बीड जिल्ह्याचा रहिवासी असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून त्याचा चेतन चौधरीशी नियमित संपर्क असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

हेही वाचा : Bishnoi Gang कडून आमदाराला धमक्या, पटोले अन् वडेट्टीवारांनी विधानसभेत आवाज चढवला

या घडामोडीनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून त्याच्याकडून विविध बाबींची माहिती घेतली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केतन अग्रवालच्या हत्येचा कथित कट राबवू नका? असा सल्ला त्याने सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही दिला होता. त्यामुळे या प्रकरणात त्याची भूमिका नेमकी काय होती आणि त्याच्याकडे आणखी कोणती माहिती आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

केतन अग्रवाल हत्याप्रकरण नेमकं काय आहे? 

या प्रकरणाच्या तपासात यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि 22 वर्षीय चेतन चौधरी यांचे प्रेमसंबंध होते. दिवाळीच्या सुमारास दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर ते एकमेकांच्या जवळ आले. मात्र त्याचदरम्यान सियाचे लग्न केतन अग्रवाल याच्याशी ठरले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, केतन हा त्यांच्या प्रेमसंबंधांमधील अडथळा ठरत असल्याची भावना दोघांच्या मनात निर्माण झाली होती. त्यातूनच कट रचल्याचा आरोप आहे. यापूर्वी लोहगड किल्ल्यावर ट्रेकदरम्यान केतनला कड्यावरून ढकलण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती तपासात समोर आली होती. त्यानंतर प्री-वेडिंग शूटच्या निमित्ताने पुन्हा लोहगडला जाण्याचा बेत आखण्यात आला. 18 जून रोजी सिया आणि केतन किल्ल्यावर गेले असताना चेतन चौधरी आधीच तेथे पोहोचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून सिया आणि चेतन यांना वेगवेगळ्या वेळेत घटनास्थळी नेऊन सीन रिक्रिएशनही करण्यात आले आहे.