दोन लग्न केलेल्या प्रेयसीची हत्या, चौथ्या तरुणाच्या संपर्कात असल्याचा प्रियकराचा दावा

मुंबई तक

• 08:28 AM • 03 Jul 2026

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका 32 वर्षीय महिलेची तिच्या प्रियकराने कथितरित्या चाकूने वार करून हत्या केली. यानंतर आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली. ही धक्कादायक घटना हरियाणातील हिसार येथील आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दोन लग्न केलेल्या प्रेयसीची हत्या

point

चौथ्या तरुणाच्या संपर्कात असल्याचा प्रियकराचा दावा

Crime News : नात्यांना काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका 32 वर्षीय महिलेची तिच्याच प्रियकराने चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, या रक्ताळलेल्या थरारानंतर आरोपी थेट पोलीस चौकीत पोहोचला आणि म्हणाला, 'मी पूजाचा खून केला आहे, ती दुसऱ्या एका तरुणाच्या संपर्कात होती.' आरोपीचे हे शब्द ऐकून पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेत घटनास्थळ गाठले, तिथे खोलीमध्ये पूजा नावाच्या महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. पोलिसांनी तत्काळ गुन्हा घडलेले ठिकाण सील करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

दोन विवाह आणि तीन मुली

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत पूजाचे यापूर्वी दोन विवाह झाले होते आणि तिला तीन मुलं आहेत. दुसरे लग्न मोडल्यानंतर ती गेल्या पाच वर्षांपासून गौरव नावाच्या तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (2 जून) पहाटे तीनच्या सुमारास पूजा आणि गौरव यांच्यात कोणत्यातरी कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, गौरवने रागाच्या भरात चाकू काढून पूजावर सपासप वार केले. तिच्या गळ्यावर, पोटावर आणि पाठीवर अनेक गंभीर जखमा झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर सकाळी 10 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली, जेव्हा आरोपीने स्वतः पोलिसांकडे जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

हे ही वाचा : मुलाच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ अन् नको ते मेसेज, महिलेच्या मानेवर हल्ला

चौथ्या तरुणाशी संपर्क अन् हत्या

पोलीस चौकशीदरम्यान आरोपी गौरवने दावा केला आहे की, पूजा गेल्या पाच-सहा महिन्यांपासून आणखी एका चौथ्या तरुणाच्या संपर्कात होती. दोन लग्नं झाल्यानंतर ती आपल्यासोबत राहत होती आणि आता ती दुसऱ्या कोणाशीतरी संबंध ठेवून होती, याच संशयातून आणि रागातून तिची हत्या केल्याचे त्याने सांगितले. मात्र, पोलिसांनी आरोपीच्या या दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पोलीस सर्व बाजूने तपास करत असून फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. तसेच हत्येसाठी वापरलेला चाकूदेखील पोलिसांनी जप्त केला असून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा : मुलाच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ अन् नको ते मेसेज, महिलेच्या मानेवर हल्ला

पूजाच्या आईचा धक्कादायक दावा

दुसरीकडे, मृत महिलेची आई संगीता यांनी आरोपी गौरववर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. गौरव आपल्या मुलीकडून चुकीची कामे करून घ्यायचा आणि तो बेकायदेशीर धंद्यांमध्ये सामील होता, असा आरोप त्यांनी केला आहे. बेकायदेशीर कृत्यांतूनच त्याने शिवनगर भागात घर आणि प्लॉट खरेदी केल्याचेही त्यांनी सांगितले. मूळचा ई-रिक्षा चालक असलेला गौरव काही महिन्यांपूर्वीच शिव कॉलनीत भाड्याच्या घरात राहण्यास आला होता, तिथेच त्याची पूजाशी ओळख झाली होती. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.