Crime News : सासऱ्याने सुनेच्याच मोबाईलवर अश्लील व्हिडिओ शेअर केल्याचा महिलेनं धक्कादायक आरोप केला आहे. आरोप असा की, यानंतर सासरा सुनेच्या माहेरी पोहोचला होता. त्याने कथितरित्या छेडछाड करत बेदम मारहाण करण्याची धमकी दिली. या प्रकरणात आता पोलिसांनी एफआरआय दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हा धक्कादायक प्रकार हिमाचल प्रदेशातील हमीरपूरमध्ये घडला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : रेवती नक्षत्रात शनीचा प्रवेश, 'या' राशींच्या लोकांनी सावध राहावं
सासऱ्याने सुनेला अश्लील व्हिडिओ
वृत्त माध्यमानुसार, पीडित महिला ही गेल्या काही महिन्यांपासून आपल्या माहेरी गेली होती. तिने सांगितलं की, सासरचं वातावरण भयंकर होतं. याचमुळे महिलेनं सासरहून पळ काढला. आरोप असा की, 3 नोव्हेंबर 2025 रोजी सासरच्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून सुनेला अश्लील व्हिडिओ पाठवले होते. यानंतर महिलेनं पीडितेला सोशल मीडियावर ब्लॉक केलं.
सुनेला जीवे मारहण्याची धमकी दिली
तक्रारदाराने सांगितलं की, 7 जानेवारी 2026 रोजी सासरा हा सुनेच्या माहेरी गेला होता. त्याने सुनेच्या माहेरच्या कुटुंबियांशी बोलण्याचा बहाना केला. नंतर महिलेला ठिकठिकाणी नेलं, त्याने व्हिडिओ आणि मेसेजबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
महिलेनं आरोप केला की, महिलेसोबत छेडछाड देखील केली होती. पीडित महिलेनं तात्काळपणे पोलस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडिता या घटनेनं भयंकर भयभीत झाली होती, जर कोणाला सांगितल्यास मारहाणीची धमकी देण्यात आली होती. मात्र, पीडितेनं धाडस दाखवून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हे ही वाचा : "भाजपचं दार बंदच, ज्यांना जायचं त्यांनी..."; देवेंद्र फडणवीसांनी पक्षफुटीवर केलं भाष्य
हमीरपुर पोलिसांनी एफआरआय दाखल केला, पोलिसांचं म्हणणं असं की, संबंधित प्रकरणात आरोपीचा तपास केला जाईल. फेसबुकवर पाठवण्यात आलेल्या कथित मेसेज आणि व्हिडिओसह डिजिटल पुराव्यांची पडताळणी केली जाईल. इतर पुरावे आणि साक्षीदारांचे जबाबही नोंदवले जातील. सध्या, संपूर्ण तपास केल्यानंतर तथ्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.
ADVERTISEMENT











