शेजारच्या महिलेसोबत वाद, निष्पाप चिमुकलीची पाण्याच्या ड्रममध्ये बुचकळून हत्या

मुंबई तक

• 07:00 AM • 03 Jul 2026

Crime news : शेजारच्या महिलेसोबत वाद झाल्याच्या कारणावरून एका निष्पाप चिमुकलीला पाण्याच्या ड्राममध्ये बुडवून तिची हत्या केली. मृत मुलीची नित्विका अशी ओळख समोर आली आहे. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. पोलीस तपासातून हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

Crime news

Crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शेजारणीने महिलेच्या मुलीला ड्रममध्ये बुडवून मारलं

point

आई सृजनाचा शेजारील स्वातीसोबत वाद

Crime news : शेजारच्या महिलेसोबत वाद झाल्याच्या कारणावरून एका निष्पाप चिमुकलीला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून तिची हत्या केली. मृत मुलीची नित्विका अशी ओळख समोर आली आहे. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. पोलीस तपासातून काही धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीची ओळख स्वाती अशी पटली असून मृत मुलीच्या आईचे नाव सृजना असे सांगण्यात येते. ही घटना आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील पुलवेंडुला येथील लिंगाला मंडळातील लोपटनुताल गावत घडली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : आईसोबत अनैतिक संबंधाचा संशय, लेकानं तरुणाला दगडानं ठेचलं

शेजारणीने महिलेच्या मुलीला ड्रममध्ये बुडवून मारलं

पोलीस आणि स्थानिकांच्या माहितीनुसार, गुरुवारी 25 जून 2026 रोजी दुपारी साडेचार वाजता ही घटना नित्विकाच्या घराजवळच घडली होती. आजूबाजूला कोणीही नसतानाही, स्वाती नावाच्या एका शेजारणीने त्या मुलीला आपल्यासोबत नेले, नंतर तिला तिच्या शेजारच्या गल्लीत एका घरातील बाथरूममधील पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून तिची हत्या केली. 

आई सृजनाचा शेजारील स्वातीसोबत वाद

संबंधित प्रकरणात असे वृत्त समोर आले की,  स्वातीचं आणि आई सृजनाचा मुलीवरून वाद झाला होता. या वादातून स्वातीनं क्रूरतेची परिसीमा गाठली, संबंधित प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला की, रागाच्या भरातच महिलेन असं क्रूर कृत्य केलं असावं. 

हे ही वाचा : Crime News : भाच्याचा मामाच्या पोरीवर जीव, विवाह केला अन् मामानं कट रचून...

अशातच पोलिसांनी स्वातीच्या घरी धाव घेतली आणि तिला ताब्यात घेतलं. स्वातीच्या घरात लावण्यात आलेल्या CCTV फुटेजमध्ये त्याच नित्विका नावाच्या छोट्या मुलीला पाहिलं, स्वाती तिला घेऊन जात होती. पुराव्याच्या आधारावर स्वातीला ताब्यात घेतलं. या घटनेनं कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली.