भाचीला पुजाऱ्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, मामाने मध्यरात्री काय केलं?

एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या खून प्रकरणात पोलिसांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. या पुजाऱ्याची हत्या त्याच्या शिष्याच्या मामाने केली होती. आरोपीने दावा केला आहे की, त्याने पुजाऱ्याला त्याच्या भाचीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले आणि काठीने त्याच्यावर हल्ला केला. उत्तर प्रदेशातील बांदामधील ही घटना आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

02 Jul 2026 (अपडेटेड: 02 Jul 2026, 11:21 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाचीला पुजाऱ्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले

point

मामाने मध्यरात्री काय केलं?

Crime News : एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या हत्येचा पोलिसांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. पुजाऱ्याची हत्या कोणत्याही बाहेरील व्यक्तीने केली नसून, त्याच्याच शिष्येच्या मामाने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने पुजाऱ्याला आपल्या भाचीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात पुजाऱ्यावर काठीने वार करून त्यांची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मामा रामविशाल आणि त्याची भाची रोशनी या दोघांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथील ही घटना आहे.

हे वाचलं का?

पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

ही घटना बांदा शहरात 20 आणि 21 जूनच्या मध्यरात्री घडली होती. घटनेच्या दिवशी मंदिरात हजर असलेल्या रोशनीनेच पोलिसांना आणि पुजाऱ्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली होती. मात्र, घटनेची प्रत्यक्षदर्शी असलेली रोशनी पोलिसांना सतत वेगवेगळी विधाने करून तपासापासून भरकटवण्याचा प्रयत्न करत होती. तिने अगदी आपल्या एका माजी प्रियकरावरही संशयाची सुई वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वैज्ञानिक पुरावे, मोबाईल सर्व्हिलन्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तिचा खोटेपणा उघड केला आणि दोघांनाही खाक्या दाखवत गुन्हा कबूल करण्यास भाग पाडले.

हे ही वाचा : 'दिल्लीने स्पष्ट सांगितलंय छोट्या मोठ्या गोष्टी महाराष्ट्रातच..', शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य

गावात उलटसुलट चर्चा

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील अजयगड येथील रहिवासी असलेली रोशनी काही महिन्यांपूर्वी आजारपणाच्या उपचारासाठी तिचा मामा रामविशाल याच्याकडे बांद्याला आली होती. मामाने तिला उपचारासाठी मंदिराच्या पुजाऱ्याकडे नेले होते. पुजाऱ्याच्या उपचारानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली, ज्यामुळे रोशनीची मंदिरातील ये-जा वाढली आणि ती पुजाऱ्याची शिष्या बनून आश्रमातच राहू लागली. काही दिवसांतच गावात त्यांच्या एकत्र राहण्यावरून आणि संबंधांवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. हीच चर्चा जेव्हा मामा रामविशालपर्यंत पोहोचली, तेव्हा तो एका रात्री सत्य जाणून घेण्यासाठी अचानक आश्रमात पोहोचला.

हे ही वाचा : लठ्ठपणावरुन टोमणे आणि पैशांची मागणी... स्टाफ नर्सची निर्घृण हत्या

पुजाऱ्याला भाचीसोबत पाहिले अन्...

रात्रीच्या वेळी पुजाऱ्याला भाचीसोबत पाहिल्यानंतर त्यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यानंतर रात्री साधारण एकच्या सुमारास रामविशाल पुन्हा आश्रमात गेला आणि संतप्त होऊन त्याने जवळच पडलेली काठी उचलून पुजाऱ्यावर जोरदार हल्ला केला, ज्यात पुजाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, रोशनीची नजर पुजाऱ्याच्या मौल्यवान मालमत्तेवर होती, अशीही चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी चार पथके नेमली होती. सर्व तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांची सखोल तपासणी करून दोन्ही आरोपींना जेलमध्ये पाठवण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.