Crime News : एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका 21 वर्षीय तरुणाने आपल्याच 19 वर्षांच्या सख्ख्या बहिणीची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. बहिणीच्या प्रेमसंबंधांमुळे कुटुंबाची बदनामी होत असल्याचा राग मनात धरून भावाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ मधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
सहा महिन्यांपासून माहेरीच
याप्रकरणातील आरोपी युवक मंगळवारी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पोलिसांसमोर आपल्या बहिणीची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्या घरी जाऊन संबंधित तरुणीचा मृतदेह हस्तगत केला. पोलिसांना दिलेल्या माहितीत आरोपीने सांगितले की, त्याची बहीण गेल्या सहा महिन्यांपासून तिच्या सासरी गेली नव्हती आणि माहेरीच राहत होती.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यावर पावसाचं मोठं संकट, 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
शेजारच्या मुलासोबत अनैतिक संबंध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे शेजारच्याच एका मुलासोबत प्रेमसंबंध होते, ज्याला तिच्या भावाचा विरोध होता. आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याची बहीण 28 जून रोजी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती आणि मंगळवारी सकाळीच ती घरी परतली होती. ती घरी परतताच संतप्त झालेल्या भावाने कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे आणि बदनामीचे कारण पुढे करत तिची गळा आवळून हत्या केली.
हे ही वाचा : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळलं, 10 विद्यार्थी जखमी, एकाचा अंत
कुटुंबियांची चौकशी
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून तिथून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, कुटुंबातील इतर सदस्यांच्या औपचारिक तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास केला जात आहे.
ADVERTISEMENT











