सुनेचे शेजारच्या तरुणाशी अफेयर, सासऱ्याला कळताच घडलं भयानक

मुंबई तक

• 10:36 AM • 30 Jun 2026

सासऱ्याला सुनेच्या अफेयरची कुणकुण लागली आणि भयानक घटना घडली. बिजनौर जिल्ह्यातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सुनेचे शेजारच्या तरुणाशी अफेयर

point

सासऱ्याला कळताच घडलं भयानक

Crime News : एका सासऱ्याने आपल्या सुनेच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिट्टू असे मृत तरुणाचे नाव असून त्याची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली. सुरुवातीच्या तपासात या हत्येमागे जुने वैमनस्य असल्याची शक्यता वर्तवली जात होती; मात्र आता आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्याची सून आणि मयत बिट्टू यांच्यातील कथित अनैतिक संबंधांच्या रागातून त्याने हे कृत्य केले. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

गावात उडाली खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी सकाळी 9 च्या सुमारास मंडावर पोलीस ठाण्यात माहिती मिळाली होती की, बिट्टूवर त्याचा शेजारी सुरेंद्र सिंग याने चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली होती आणि पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला होता.

हे ही वाचा : केतन-सियाने प्रवास केला 'त्या' कारच्या ड्रायव्हरचा थरारक खुलासा

सुनेसोबत अनैतिक संबंध असल्याचा राग

या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी आरोपी सुरेंद्र सिंग याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, त्याची सून आणि मयत बिट्टू यांच्यात अनैतिक संबंध होते. यावरून तो अनेक दिवसांपासून नाराज होता आणि त्याने अनेकदा दोघांनाही समजावण्याचा तसेच विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. रविवारी सकाळी याच मुद्द्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि वाद वाढल्यावर संतापाच्या भरात सुरेंद्रने चाकू काढून बिट्टूवर हल्ला केला. छातीत चाकू लागल्याने बिट्टू गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा : नागपूर : कानाखाली मारल्याचा राग, भावाला बोलावले अन् तलवारीने...

चाकूने सपासप वार

घटनेच्या वेळी बिट्टू त्याचा चुलत भाऊ आसू याच्यासोबत गावातील एका दुकानात कोल्ड्रिंक पिण्यासाठी जात होता, तेव्हा वाटेत सुरेंद्रने त्याला अडवले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये आधी शिवीगाळ झाली आणि नंतर सुरेंद्रने चाकूने हल्ला केला. आसूने मध्यस्थी करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपी वार करतच राहिला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तो सांगत असलेल्या कारणाची पोलीस सखोल चौकशी करत आहेत. आरोपीचे दावे कितपत खरे आहेत याचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.