Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने 17 वर्षीय अल्पवयीन पुतण्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर तिने अल्पवयीन मुलावर सोबत राहण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या मुलाने हे प्रकरण आपल्या आईला सांगितले, यामुळे हे प्रकरण बाहेर आले. उत्तर प्रदेशातील अलीगड परिसरातील ही घटना आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नात्याच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT
सातत्याने ठेवले शारीरिक संबंध
पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, शेजारी राहणाऱ्या आणि नात्याने चुलती लागणाऱ्या या तीन मुलांच्या आईने गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या अल्पवयीन मुलाला आपल्या जाळ्यात अडकवून ठेवले होते. या महिलेने त्याच्याशी सातत्याने अनैतिक संबंध ठेवले आणि त्याला कायमचे आपले बनवण्यासाठी ती दबाव टाकू लागली. जर त्याने हे संबंध तोडले किंवा सोबत राहण्यास नकार दिला, तर त्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकी ती देत असे. या सततच्या धमक्यांना कंटाळून आणि घाबरून अखेर त्या मुलाने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला, ज्यामुळे कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली.
हे ही वाचा : दोन वकिलांचा किस्सा, कोर्टातील युक्तिवाद आणि न सापडलेली पँट
अडीच महिन्यांची गर्भवती
प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन गावकऱ्यांच्या विनंतीवरून गावात एक सामाजिक पंचायत बोलावण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या पंचायतीमध्ये महिलेच्या पतीने आणि इतर नातेवाइकांनी तिला सामाजिक प्रतिष्ठेचा हवाला देत खूप समजवण्याचा प्रयत्न केला. तिचा पती तिला पुन्हा स्वीकारण्यास आणि सोबत ठेवण्यास तयार होता, मात्र ती महिला कोणत्याही परिस्थितीत आपला हट्ट सोडायला तयार नव्हती. तिने भर पंचायतीत कबुली दिली की ती या अल्पवयीन पुतण्यासोबतच्या संबंधांतून अडीच महिन्यांची गर्भवती आहे आणि तिला केवळ त्याच्यासोबतच राहायचे आहे.
हे ही वाचा : 'तुझ्यासारखे हजार नवरे करु शकते..' प्रेग्नंट बायको अन् नवऱ्याचा वाद, पुढं काय घडलं?
पॉक्सो अंतर्गत गुन्हा
महिलेने पतीसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आणि अल्पवयीन मुलाच्या शोषणाची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी चुलतीविरुद्ध पॉक्सो कायद्यासह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तिला अटक केली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तिची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











