24 वर्षीय तरुणीला मोमोजचं आमिष दाखवलं, धावत्या गाडीत नको तेच...

Crime news : एका धावत्या कारमध्ये 24 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. संबंधित प्रकरणात पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली. तरुणीने आपल्या तक्रारीत नमूद केलं की, तिला मोमोज खाण्याच्या बहाण्याने बाहेर नेलं.

Crime news

Crime news

मुंबई तक

• 02:57 PM • 30 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणीला लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती 

point

BNS संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल

point

पुण्यात असाच धक्कादायक प्रकार 

Crime news : पूर्व दिल्लीच्या मंडावली परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका धावत्या कारमध्ये 24 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. संबंधित प्रकरणात पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली. तरुणीने आपल्या तक्रारीत नमूद केलं की, तिला मोमोज खाण्याच्या बहाण्याने बाहेर नेलं. नंतर कारमध्ये CNG भरण्याचे काम सांगून गाडी थांबवली आणि नंतर तिच कार एका निर्जनस्थळी परिसरात नेली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : शाळेतील विद्यार्थी मित्राला समलैंगिक संबंधासाठी विचारलं, नकार देताच..

तरुणीला लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती 

महिलाने आरोप केला की, थोड्याच वेळेत तरुण अश्लील भाषेत बोलू लागला होता. नंतर तरुणीला लैंगिक संबंध ठेवण्यास त्याने जबरदस्ती केली. तिला चुकाचा स्पर्श केला होता, तिला गाडीतच कोंडलं. तरुणाने मोबाईल फोनमध्ये सर्व चित्र रेकॉर्ड केले. पीडितेनं पोलीस ठाण्यात या प्रकरणाबाबत तक्रार दाखल केली. 

BNS संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल

तक्रारीच्या आधारावर मंडावली पोलिसांनी BNS संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी विरोधात FIR दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. असाच एक धक्कादायक प्रकरण काही दिवसांपूर्वी पुण्यात उघडकीस आला होता. 

हे ही वाचा : नवी मुंबईच्या रस्त्यांना नाल्याचं स्वरुप, पावसानं बेदम झोडपलं

पुण्यात असाच धक्कादायक प्रकार 

पुण्यात धावत्या कारमध्ये एका वकील महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. असाच प्रकार दिल्लीत झाल्याचे आढळून आले. वकील महिला एका हॉटेलमध्ये होती, त्याच हॉटेलमध्ये संबंधित वकील महिला बसली होती, नंतर त्यांच्यात बोलणं झालं, मात्र याचाच गैरफायदा संबंधित आरोपींनी घेतला.