“घरात कोण आहे”; मराठा सर्वेसाठी आले अन् तहसीलदाराच्या पत्नीला चाकू दाखवून…

रोहिणी ठोंबरे

• 10:42 AM • 31 Jan 2024

Amravati Crime News : अमरावती शहरातील राठीनगर परिसरात दिवसाढवळ्या दोन दरोडेखोरांनी तहसीलदाराच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत लूटमार केली. घरात एकट्या असलेल्या महिलेला धमकावून चोरट्यांनी रोख रक्कम आणि पाच लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पळ काढला.

Amravati Crime News 2 Goons Robbed Tehsildar Wife At knifepoint in her house

Amravati Crime News 2 Goons Robbed Tehsildar Wife At knifepoint in her house

follow google news

Amravati Crime News : अमरावती (Amravati) शहरातील राठीनगर परिसरात दिवसाढवळ्या दोन दरोडेखोरांनी (robbers) तहसीलदाराच्या (tehsildar) घरात घुसून चाकूचा धाक दाखवत लूटमार केली. घरात एकट्या असलेल्या महिलेला धमकावून चोरट्यांनी रोख रक्कम आणि पाच लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पळ काढला. (Amravati Crime News 2 Goons Robbed Tehsildar Wife At knifepoint in her house )

हे वाचलं का?

या घटनेनंतर अमरावती शहरातील राठीनगर येथे खळबळ उडाली आहे. सरकार आणि प्रशासनाच्या वतीने जनगणना सुरू झाली आहे याबाबत माहिती गोळा करण्यासाठी आलो आहोत. असं सांगून दोन दरोडेकोर तहसीलदाराच्या घरात घुसले.

वाचा : Maratha Reservation : आरक्षणाचा वाद पेटला, भुजबळांचं चॅलेंज जरांगे स्विकारणार का?

महिलेला एकटं पाहून तहसीलदाराच्या घरात घुसलेल्या या दोन चोरट्यांनी तिचे नाव व इतर लोकांची माहिती विचारली. यावेळी त्यांनी प्यायला पाणी मिळेल का असं विचारलं? महिला पाणी आणण्यासाठी आत गेली असता संधीचा फायदा घेत दोन्ही चोरट्यांनी महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला धाक दाखवला.

मारून टाकण्याची धमकी देत दागिन्यांसह लाखो रूपये केले लंपास

दरोडेखोरांनी महिलेला घरातील सर्व रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने बाहेर काढण्यास सांगितले. तसं न केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने तिने घातलेले सोन्याचे दागिने, 10,000 रुपये रोख आणि 5 लाख रुपयांच्या वस्तू दरोडेखोरांकडे सुपूर्द केल्या.

वाचा : Chhagan Bhujbal : महायुतीत वाद! शिंदेंच्या आमदारांनी मागितला भुजबळांचा राजीनामा

यानंतर दरोडेखोरांनी महिलेला धक्काबुक्की करून तिथून पळ काढला. लगेच महिलेने आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक त्यांच्या घरी पोहोचले आणि महिलेने सर्व प्रकार त्यांना सांगितला.

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तयार केली पथके

घटनेच्या वेळी दोन्ही दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. महसूल अधिकाऱ्याच्या घरी अशी घटना घडणे ही पोलीस व प्रशासनासाठी गंभीर बाब आहे.

वाचा : Chhagan Bhujbal : अशोक सराफांसोबत भुजबळांनी ‘या’ चित्रपटात केलंय काम

याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

    follow whatsapp